(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
बॉलीवूडमधील अनेक कलाकार सध्या गणेश चतुर्थीच्या उत्सवात मग्न आहेत. अलिकडेच ऐश्वर्या राय आणि तिची मुलगी आराध्या बच्चनसोबत मुंबईतील जीएसबी गणपती उत्सवात सहभागी झाली होती. दोघांचेही अनेक फोटो आणि व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. आजकाल ऐश्वर्या अनेकदा तिच्या मुलीसोबत दिसते, मग तो आनंदाचा प्रसंग असो किंवा एखादा कार्यक्रम. तसेच आता अभिनेत्री मुलीसोबत बाप्पाच्या दर्शनाला पोहचली, आणि दोघींचा अंदाज चाहत्यांच्या पसंतीस आला आहे.
ऐश्वर्या तिच्या मुलीसोबत गणेशोत्सव मंडपात पोहोचली
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, ऐश्वर्या तिची मुलगी आराध्यासोबत गणेशोत्सव मंडपात बाप्पाचे आशीर्वाद घेण्यासाठी पोहोचताना दिसत आहे. ऐश्वर्या आणि आराध्याचे चाहत्यांनी हसतमुखाने स्वागत केले आणि पंड्यात प्रवेश करण्यापूर्वी काही सेल्फी काढण्यासाठी त्यांना थांबले. त्यांना पाहून चाहते खूप आनंदी झाले. तसेच अभिनेत्रीने चाहत्यांचे आभार मानले.
आई आणि मुलीची जोडी खूपच सुंदर दिसत होता
ऐश्वर्या राय पांढऱ्या रंगाच्या पोशाखात खूपच सुंदर दिसत होती, ज्यामध्ये तिने लाल रंगाची लिपस्टिक आणि कपाळावर छोटी टिकली लावली होती. आराध्या देखील पिवळ्या कुर्त्यात सुंदर दिसत होती. आराध्याने पंडालमध्ये अतिशय सुंदरपणे आपली उपस्थिती दाखवली. दोघांनीही पंडालमध्ये हात जोडून फोटो काढले. तसेच, अभिषेक बच्चन दोघांसोबत समारंभात उपस्थित राहिला नाही. ऐश्वर्या दरवर्षी भगवान गणेशाचे आशीर्वाद घेण्यासाठी जीएसबी गणपती समारंभात उपस्थित राहते.
Bigg Boss 19 : बिग बॉसच्या घरात गोंधळ, सोडले कुनिकाने कॅप्टनपद! नक्की झाले काय?
ऐश्वर्या रायचा चित्रपट
ऐश्वर्या राय शेवटची मणिरत्नमच्या ऐतिहासिक ॲक्शन ड्रामा ‘पोन्नियिन सेल्वन II’ मध्ये दिसली होती. या चित्रपटात विक्रम, रवी मोहन, कार्ती, त्रिशा कृष्णन, जयराम आणि आर सरथकुमार यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जगभरात ३४४.६३ कोटी रुपयांची कमाई केली. तसेच अभिनेत्रीचा हा चित्रपट आणि तिची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली.