
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
भूल भुलैया फ्रँचायझीमधील सर्व चित्रपट खूप यशस्वी झाले आहेत. आता हॉरर-कॉमेडी फ्रँचायझीचा पुढचा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अलीकडेच, दिग्दर्शक अनीस बझमी यांनी “भूल भुलैया ४” वर काम करण्याबद्दल उत्साह व्यक्त केला आहे. त्यांनी पुढच्या भागाच्या कलाकारांबद्दल अपडेट दिले आहेत. त्याबद्दल त्यांचे आणखी काय म्हणणे आहे हे आपण जाणून घेणार आहोत. तसेच चित्रपटामध्ये अक्षय कुमार आणि कार्तिक आर्यन एकत्र दिसणार असल्याचे समोर आले आहे.
“चलो बुलावा आया है, ट्रंप ने बुलाया है…”, गॅरी संधूने केला देवीचा अपमान; शिवसेनेच्या रडारवर आला गायक
‘भूल भुलैया ४’ बद्दल अपडेट
टीओआयने अनीस बझमी यांच्याबद्दल लिहिले की, “चित्रपटाच्या कथेवर आणखी खूप काम सुरु आहे, पण आम्ही ‘भूल भुलैया २’ आणि ‘भूल भुलैया ३’ बनवल्यामुळे, आम्हाला ‘भूल भुलैया ४’ देखील बनवावे लागेल. चर्चा सुरू आहे, पण अद्याप कोणतेही ठोस पाऊल उचलले गेले नाही. कार्तिक आर्यनने रूह बाबा म्हणून स्वतःसाठी चांगले नाव कमावले आहे, म्हणून तो या भूमिकेत असावा.” असे त्यांनी म्हटले आहे.
अक्षय आणि कार्तिक दिसणार एकत्र?
पुढील भागात अक्षय कुमार असेल का असे विचारले असता, अनीस बझमी म्हणाले की, “ही एक उत्तम कल्पना आहे. भूषण कुमार आणि मी चर्चा केली आणि आपण दोघांना एकत्र कास्ट करू शकतो का यावर चर्चा केली. पिवळ्या रंगात अक्षय कुमार आणि काळ्या रंगात कार्तिक आर्यन हे एक उत्तम पर्याय असतील.” असे त्यांनी म्हटले आहे. या बातमी दोन्ही अभिनेत्याचे चाहते खुश झाले आहेत. या दोघांची एकत्र केमिस्ट्री पाहायला मज्या येणार आहे.
भूल भुलैया फ्रँचायझी प्रेक्षकांना खूप आवडली. भूल भुलैया फ्रँचायझीला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटावर चाहते अजूनही वेडे आहे, अक्षय कुमार आणि विद्या बालन यांचा चित्रपट “भूल भुलैया” २००७ मध्ये प्रदर्शित झाला. त्यानंतर २०२२ मध्ये “भूल भुलैया २” प्रदर्शित झाला, ज्यामध्ये कार्तिक आर्यनने रूह बाबा म्हणून भूमिका केली होती. “भूल भुलैया ३” २०२४ मध्ये प्रदर्शित झाला. तिन्ही चित्रपटांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आणि बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली. आता ‘भूल भुलैया ४’ ची काय धुमाकूळ घालतोय हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.