(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
नुकताच अभिनेत्री निर्माती तेजस्विनी लोणारी हीचा साखरपुडा पार पडला तिने सोशल मीडिया वर देखील तिच्या या खास क्षणाचे फोटो शेयर केले पण यात सगळयात लक्षवेधी ठरला तो तिचा लूक. पिवळ्या रंगाची पैठणी, मराठमोळा लूक आणि सोबतीला मराठमोळा साज !
तेजस्विनी हिच्या साखरपुड्याच्या दागिन्यांची गोष्ट काही वेगळी आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही कारण कोणत्याही मुलीसाठी दागिने हा अगदीच जिव्हाळ्याच्या विषय असतो आणि लग्न समारंभ म्हणा किंवा साखरपुडा या खास क्षणासाठी घातलेलं दागिने खूप स्पेशल असतात अशी काही शी गोष्ट तेजस्विनी ची सुद्धा आहे.
तेजस्विनी येवल्याची असल्याने तिच्या या खास दिवशी पैठणी नसेल अस होणार नाही आणि म्हणून तिने सुंदर पैठणी नेसली होती आणि त्याला साजेसा लूक केला होता. पारंपरिक अंदाजात तेजस्विनी अगदीच सुंदर दिसत होती पण खरी गंमत तिच्या या दागिन्यांची आहे.
तेजस्विनी या बद्दल बोलताना सांगते ” माझ्या आयुष्यातल्या खास क्षणी मला आपलासा वाटणारा लूक हवा होता आणि म्हणून माझी पिवळी पैठणी आणि आईने हौशीने केलेलं दागिने हे सगळं हे खूप खास होत. आईने केलेली नथ आणि बाजूबंद गळ्यात असलेला एक सुंदर हार हे सगळं आईने माझ्यासाठी अगदी हौशीने केलेल्या दागिन्यां पैकी आहेत. प्रत्येक आईला आपल्या मुलीला तिच्या आयुष्याची नवीन सुरुवात करताना एक भेट द्यायची असते आणि ती या खास शृंगाररुपात आहे अस मला वाटत आणि म्हणून साखरपुड्याला मी हा मराठमोळा साज असलेला लूक केला होता”
अभिषेक बजाजच्या Ex पत्नीने अशनूर कौरसोबतच्या नात्यावर केली टीका, म्हणाली “२१ वर्षांच्या मुलीसोबत…”
तेजस्विनी कायम तिच्या फॅशन लूक मधून वैविध्यपूर्ण लूक करताना बघायला मिळते आणि तिच्या या खास दिवशी तिने केलेला हा सुंदर देखणा आणि लक्षवेधी लूक देखील तितकाच सुंदर आहे.






