(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
बॉलीवुड अभिनेता अक्षय कुमारचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अक्षय कुमारचे प्रचंड चाहते आहेत. चाहते त्याला सार्वजनिक ठिकाणी पाहिले की त्याच्या सोबत सेल्फी काढण्यासाठी धावत येतात.अशीच एक घटना शुक्रवारी मुंबई विमानतळावर सेल्फी घेत असताना घडली. सगळे जण फोटो घेत असताना या गर्दीत एक चाहता सेल्फी काढण्यासाठी अक्षय कुमारच्या अगदी जवळ आला. त्याने अक्षयच्या पाठीवर हात ठेवला. त्यामुळे अक्षय कुमार काहीसा अवघडला. त्याने त्या चाहत्याला फटकारलं आणि दूर व्हायला सांगितलं. हा संपूर्ण व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.
अक्षय कुमार एका फॅनला त्याच्या खांद्यावरून हात काढण्यास सांगताना दिसतो.व्हिडिओमध्ये, एक फॅन अक्षयच्या खांद्यावर हात ठेवतो, ज्यावर अक्षय चिडून “हात नको ठेऊ” असे सांगतो.
या व्हिडिओवर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमठत आहेत. अनेक युजर्सनी अक्षय कुमारला पाठिंबा दिला आहे.तर काहींनी अक्षय कुमारने असा अहंकार दाखवू नये अशी प्रतिक्रिया दिली आहे. अनेक चाहत्यांनी कलाकारांना भेटताना योग्य मर्यादा पाळणं किती महत्त्वाचं आहे, असं मत व्यक्त केलं आहे. काहींनी म्हटलं की, चाहत्यांनी मर्यादा ओलांडू नये कारण कलाकारांना कधी कधी अस्वस्थता जाणवते. अशा प्रकारे अनेकांनी अक्षय कुमारच्या वागणुकीचं समर्थन केलं आहे.
Nita Ambani: नीता अंबानींनी त्यांच्या नातीला म्हटले ‘लक्ष्मी’, हृदयस्पर्शी व्हिडिओने वेधले लक्ष
अक्षय कुमार ‘जॉली एलएलबी 3’ या चित्रपटात अरशद वारसी सोबत मुख्य भूमिका साकारताना पाहायला मिळाला. हा चित्रपट सुभाष कपूर यांनी दिग्दर्शित केला आहे. ‘जॉली एलएलबी 3’ जवळपास ८ वर्षांनी अक्षयचा मोठा कमबॅक ठरला. यात हुमा कुरैशी, अमृता राव, सौरभ शुक्ला आणि गजराज राव सारखे कलाकारांनी सुद्धा महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.
आता अक्षय पुढच्या चित्रपटात ‘भूत बंगला’ मध्ये दिसणार आहेत. यामध्ये तब्बू, परेश रावल, शरमन जोशी, मिथिला पालकर, जावेद जाफरी आणि बरेच कलाकार सुद्धा असतील.