(फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
अभिनेत्री कतरीना कैफ आणि विकी कौशल यांनी अखेर त्यांच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे, हे दोघंही लवकरच पालक होणार आहेत. ही बातमी समोर येताच सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला आहे.जी आता सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे. कतरिनानं शेअर केलेल्या फोटोवर तिने एक खास कॅप्शनही दिले आहे.
तिच्या पोस्टखाली बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींना कमेंट्स करीत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. दीपिका पादुकोण, अनुष्का शर्मा, प्रियांका चोप्रा, शर्वरी वाघ, मृणाल ठाकूर, आयुष्मान खुराना, वरुण धवन, रोहित शेट्टी यांसारख्या अनेकांनी कमेंट्स करीत त्यांना शुभेच्छा दिल्या.या गोड क्षणी अभिनेता अक्षय कुमारही मागे राहिला नाही. ‘नमस्ते लंडन’ चित्रपटात कतरीनासोबत स्क्रीन शेअर करणाऱ्या अक्षयने दोघांना शुभेच्छा दिल्या आणि कमेंटमध्ये एक मजेशीर सल्लाही दिला आहे.
भैरवीच्या आयुष्यात आव्हानांचा डोंगर, अशोक मामा मात्र भूमिकेवर ठाम! मालिकेला आता नवं वळण
अक्षयनं कतरिनाच्या पोस्टखाली कमेंट केली आहे की, “कैतरीना आणि विकी, तुमच्यासाठी मी खूप आनंदी आहे. मी जेवढं तुम्हाला ओळखतो, त्यानुसार मला खात्री आहे की तुम्ही दोघेही उत्तम आई-बाबा व्हाल,फक्त एका विनंती आहे. बाळाला इंग्रजी आणि पंजाबी दोन्ही शिकवा! भरपूर प्रेम आणि आशीर्वाद! जय महादेव!” असा खास सल्ला दिला आहे,अक्षयचा हा विनोदी आणि प्रेमळ सल्ला पाहून चाहत्यांनी कमेंट्समध्ये जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.
अक्षय आणि कतरीनानं एकत्र काम केलेल्या आठ चित्रपटांमध्ये हमको दीवाना कर गए, नमस्ते लंडन, वेलकम, सिंग इज किंग, ब्लू, दे दना दन, तीस मार खान आणि सूर्यवंशी यांचा समावेश आहे. या दोघांच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीला प्रेक्षकांचाही चांगला प्रतिसाद मिळालेला आहे.
अक्षय कुमारनं विकीबरोबर अलीकडेच केसरी २ या चित्रपटात काम केलेलं.
‘दशावतार’नंतर सिद्धार्थ मेनन गाण्यातून करणार धमाका, ‘मना’चे श्लोकमधील ‘हैय्या हो’ गाणं प्रदर्शित
दरम्यान अक्षय कुमार सध्या ‘जॉली एलएलबी ३’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत असून या चित्रपटाने आतापर्यंत भारतात ₹६५.५० कोटी कमावले आहेत. जगभरातील कमाईच्या बाबतीत, अक्षय कुमार आणि अर्शद वारसी स्टारर चित्रपटाने जगभरात ₹९१.७५ कोटी कमावले आहेत. आठवड्याच्या शेवटी चित्रपटाची कमाई वाढण्याची अपेक्षा आहे, लवकरच हा आकडा १०० कोटींपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. येत्या काही दिवसांत भारताच्या कमाईतही वाढ होण्याची शक्यता आहे.