(फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
कलर्स मराठीवरील अशोक मा.मा.मालिकेत या आठवड्यात भैरवीच्या आयुष्यात एकामागून एक घडामोडी घडताना दिसणार आहेत. कुटुंब, सोसायटी आणि बिझनेस अशा तिन्ही पातळ्यांवर दबाव वाढताना पाहायला मिळणार आहे. एकीकडे बिझनेसची स्वप्नं साकार करण्याचा तिचा प्रयत्न, तर दुसरीकडे सोसायटी आणि घरातील निर्माण होणारे तणाव या सगळ्यात भैरवीची खरी कसोटी लागणार आहे. या प्रवासात भैरवीच्या पाठीशी अशोक मा.मा. अधिक ठाम आणि निर्धाराने उभे राहताना दिसतील. त्यांच्या आयुष्याशी संबंधित काही महत्वाचे निर्णय आणि ठाम भूमिका कथानकाला नवं वळण देणार आहेत. मामा केवळ भैरवीचा आधार ठरणार की त्यांच्या या भूमिकेमुळे घरात नवे वाद निर्माण होणार हा प्रश्न प्रेक्षकांना सतत पडत राहील. मालिकेत पुढे काय घडणार पाहावं लागणार आहे.
दरम्यान, भैरवीचा आत्मविश्वास, तिच्या कुटुंबातील वेगवेगळ्या व्यक्तींची तिला मिळणारी साथ आणि विरोध, तसेच सोसायटीतील काही लोकांची कारस्थानं हे सगळं एकत्र आल्यामुळे पुढील काही दिवस मालिकेत तणावपूर्ण वळणं दिसतील. याचबरोबर भैरवीला मिळणाऱ्या धमक्या, घराभोवती वाढणारा तणाव, सोसायटीतील गुपितं, अनपेक्षित पाहुण्यांचा प्रवेश, पोलिस तपास यामुळे भैरवीची कसोटी आणखी कठीण होणार आहे.
‘दशावतार’नंतर सिद्धार्थ मेनन गाण्यातून करणार धमाका, ‘मना’चे श्लोकमधील ‘हैय्या हो’ गाणं प्रदर्शित
भैरवीच्या प्रयत्नांना मिळणारा जबरदस्त धक्का. त्यातून ती पुढे कोणता निर्णय घेते, तिच्या प्रत्येक पावलामागे ‘अशोक मामा’ची ठाम साथ आणि विचारांची छाप कशी राहते, आणि तिच्या बिझनेसच्या स्वप्नांचा प्रवास कोणत्या नव्या दिशेला वळतो हे प्रेक्षकांसाठी मोठं कुतूहल ठरणार आहे. या आठवड्यातील प्रत्येक भाग प्रेक्षकांसाठी नवे ट्विस्ट्स घेऊन येणार असून, नाती, विश्वासघात, धमक्या आणि स्वप्नांसाठीची झुंज यांचं एक रोमहर्षक मिश्रण उलगडणार आहे.
मिलान फॅशन वीकमध्ये आलिया भट्ट आणि BTS’ जिनची भेट; सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल
कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘अशोक मा.मा.’ हिने नुकताच १०० भागांचा टप्पा पूर्ण केला आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांचा छोट्या पडद्यावरचा हा कमबॅक प्रेक्षकांसाठी विशेष ठरला आहे.या मालिकेत अशोक सराफ यांनी एक प्रेमळ, पण कडक शिस्तीचा “मामा” साकारला आहे. ज्याच्यावर अचानक आपल्या नातवंडांची जबाबदारी येते. सुरुवातीला या मुलांना त्याच्याशी नातं जुळवणं कठीण जातं, पण नंतर त्याच्या प्रेमळ स्वभावामुळे सर्वांच्या आयुष्यात बदल घडतो.
दिग्दर्शक केदार वैद्य आणि लेखक चिन्मय मांडलेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मालिका दर्जेदार अभिनय, संवाद आणि कथानकामुळे लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली आहे.