
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
वायआरएफ स्पाय युनिव्हर्सचा आगामी अॅक्शन एंटरटेनर ‘अल्फा’ आता मूळ ख्रिसमस रिलीजऐवजी एप्रिल 2026 पर्यंत प्रदर्शित होणार आहे. चित्रपटामध्ये आलिया भट्ट, शर्वरी वाघ आणि बॉबी देओल यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
यशराज फिल्म्सने नवीन रिलीज तारीख अधिकृतपणे जाहीर केली असून, विलंबाचे कारणही स्पष्ट केले आहे. चित्रपटाचे व्हीएफएक्स (VFX) काम अजूणही पूर्ण झालेले नाही, आणि निर्मात्यांच्या म्हणण्यानुसार, प्रेक्षकांसाठी “आश्चर्यकारक दृश्य अनुभव” देण्यासाठी अधिक वेळ लागणार आहे.
‘अल्फा’ हा चित्रपट वायआरएफ स्पाय युनिव्हर्सचा महत्वाचा भाग असल्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता तितकीच आहे. व्हीएफएक्स आणि अॅक्शन सीन पूर्ण झाल्यानंतरच निर्मात्यांनी उत्कृष्ट अनुभव देण्याच्या दृष्टीने रिलीज ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
वायआरएफ स्पाय युनिव्हर्समध्ये आलिया भट्ट आणि शर्वरी वाघ यांचा प्रवेश आगामी चित्रपट ‘अल्फा’मधून होणार आहे. या चित्रपटात अनिल कपूर देखील प्रमुख भूमिकेत आहेत, जे अलीकडेच फ्रँचायझीच्या “वॉर २” मध्ये दिसले होते.
#War2 Post Credit Scene Out! Post-credit scene of the film offers the 1st glimpse of #BobbyDeol ’s character from #Alpha, which stars #AliaBhatt & #SharvariWagh. He is seen inking the logo of the secret agency on a young girl’s hand, who could purportedly be Alia’s character. pic.twitter.com/OkuxYs7rWG — MOHIT_R.C (@Mohit_RC_91) August 14, 2025
माहितीप्रमाणे, फ्रँचायझीचे मागील दोन चित्रपट, “वॉर २” आणि “टायगर ३”, बॉक्स ऑफिसवर अपेक्षेनुसार कामगिरी करू शकले नाहीत. या अनुभवामुळेच ‘अल्फा’ रिलीज पुढे ढकलण्यात आला आहे. निर्माते आणि यशराज फिल्म्सची उद्दिष्टे ठाम असून, मालिकेतील पुढील भागासाठी कोणतीही कसर सोडली जाणार नाही.
यशराज फिल्म्सच्या एका प्रवक्त्याने म्हटले, “अल्फा, आमच्यासाठी अत्यंत खास चित्रपट आहे आणि आम्ही त्याला प्रेक्षकांसमोर सर्वोत्कृष्ट चित्रपट अंदाजात सादर करू इच्छितो. आम्हाला जाणवले की व्हीएफएक्समध्ये आधीच्या अंदाजापेक्षा जास्त वेळ लागणार आहे. आम्ही यात कोणतीही कसर सोडू इच्छित नाही आणि अल्फा हा असा थिएट्रिकल अनुभव देईल, जो लोकांना नेहमी लक्षात राहील. त्यामुळे, आता हा चित्रपट 17 एप्रिल 2026 रोजी प्रदर्शित होईल.”