(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
अमिताभ बच्चन आणि श्रीदेवी यांचा चित्रपट ‘खुदा गवाह’ बॉक्स ऑफिसवर प्रचंड यशस्वी ठरला. हा चित्रपट १९९२ मध्ये प्रदर्शित झाला होता.या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर कायमस्वरूपी ठसा उमटवला. मात्र, फार कमी लोकांना माहीत आहे की, हा चित्रपट एका युद्धक्षेत्रात म्हणजेच अफगाणिस्तानमधील खऱ्या युद्धभूमीवर शूट करण्यात आला होता.
बॉलिवूड हंगामाशी बोलताना चित्रपटाचे निर्माता मनोज देसाई यांनी अलीकडेच खुलासा केला की अमिताभ बच्चन आणि श्रीदेवी यांच्या ‘खुदा गवाह’च्या अफगाणिस्तानमधील शूटिंगपूर्वी दोघांच्या आई‑वडिलांना मोठी भीती होती. देसाई म्हणाले, “जेव्हा आम्ही अफगाणिस्तानला जाण्याची तयारी करीत होतो, तेव्हा श्रीदेवी यांच्या आईनं मला सांगितलं, ‘मनोजजी, जर माझ्या मुलीला काही झालं, तर परत येऊ नकोस. नाहीतर मी तुला मारून टाकीन. ”
Good News: मुलगा झाला हो! परिणीती चोप्रा झाली आई, राघव चढ्ढाने शेअर केली आनंदाची बातमी
त्याचप्रमाणे, अमिताभ यांच्या आई तेजी बच्चन या देखील म्हणाल्या, “जर मुन्ना (अमिताभ)ला काहीही झालं आणि जर जयानं पांढरी साडी नेसली, तर तूही आत्महत्या करशील आणि तुझी पत्नीही पांढरी साडी नेसेल.” देसाईनं स्पष्ट केलं की हे शब्द रागातून नव्हते, तर आईच्या भीती आणि प्रेमातून नव्हते.
आई झाल्यानंतर Deepika Padukoneने केला मोठा बदल, इन्स्टाग्रामवर दिसली खास झलक, फोटो होत आहेत व्हायरल!
‘खुदा गवाह’ चित्रपट भारतात सुपरहिट ठरला
सगळे धोके, भीती आणि तणाव असतानाही, चित्रपटाचं शूटिंग यशस्वीपणे पूर्ण झालं आणि सर्व कलाकार आणि टीम सुरक्षित परत आले. मुकुल आनंद दिग्दर्शित ‘खुदा गवाह’ हा चित्रपट भारतात ₹१८ कोटींपेक्षा जास्त कमाई करून सुपरहिट ठरला.काबुलमधल्या थिएटरमध्ये सुद्धा हा चित्रपट सलग १० आठवडे हाउसफुल चालला होता. जे त्या काळात खूप मोठी गोष्ट मानली जात होती.’खुदा गवाह’ हा केवळ एक चित्रपट नव्हता, तर भारत आणि अफगाणिस्तानमधल्या मैत्रीचं एक खास उदाहरण ठरला. इतकंच नाही, तर अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अमिताभ बच्चन यांच्यावर इतके खुश होते की त्यांनी त्यांच्या सुरक्षेसाठी सेना पाठवली होती.