(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
बॉलिवूडमध्ये आनंदाची बातमी! अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा आईबाबा झाले आहेत. चड्ढा कुटुंबात गोंडस चिमुकल्याचा आगमन झाला आहे. सोशल मीडियावर पोस्टद्वारे परिणीती आणि राघवने चाहत्यांसोबत ही आंनदाची बातमी दिली आहे. परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांच्यासाठी ही दिवाळी खास ठरली आहे. ही दिवाळी त्यांच्या आयुष्यात नवीन आनंद घेऊन आली आहे. काही वेळापूर्वीच परिणीताला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं.
परिणीती आणि राघव चड्डा हे आईबाबा झाले आहे.”याआधीच आयुष्य आम्हाला आठवत नाही…पहिलं आम्ही एकमेकांसाठी होतो. आता आमच्याकडे सगळं काही आहे”, असं म्हणत परिणीती आणि राघवने मुलगा झाल्याचं सांगितलं आहे. त्यांच्या पोस्टवर कमेंट करत चाहते आणि सेलिब्रिटींनी आनंद व्यक्त केला आहे.
”खांद्यावरचा हात…”,अक्षय कुमार चाहत्यावर भडकला, एअरपोर्टवरचा ‘तो’ व्हिडिओ होतोय व्हायरल
Nita Ambani: नीता अंबानींनी त्यांच्या नातीला म्हटले ‘लक्ष्मी’, हृदयस्पर्शी व्हिडिओने वेधले लक्ष
२५ ऑगस्ट २०२५ रोजी परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा या दोघांनी अभिनेत्याच्या प्रेग्नंसीची अधिकृत घोषणा केली. त्यांनी त्यांच्या आई बाबा होण्याबद्दल पुष्टी करणारी एक गोड पोस्ट शेअर केली, ज्यामध्ये लिहिले होते, “१+१=३.” हे पाहून चाहत्यांनी त्यांना अभिनंदन केले आणि ते देखील खुश झाले.
परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांनी २०२३ मध्ये लग्नगाठ बांधली होती. लग्नानंतर दोन वर्षांनी ते आईबाबा झाले आहेत. ऑगस्ट महिन्यात परिणीतीने आपल्या गरोदरपणाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. आता चिमुकल्या आगमनाने दोन्ही कुटुंबांमध्ये प्रचंड आनंदाचे वातावरण आहे.