Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘तस्करी’मध्ये ‘ही’ मराठी अभिनेत्री झळकणार इम्रान हाश्मीसोबत; पहिल्यांदाच दिसणार नवी जोडी, टीझरने वाढवली चाहत्यांची उत्सुकता

ही मराठी अभिनेत्री लवकरच नेटफ्लिक्सवर एका नव्या कोऱ्या वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Dec 15, 2025 | 02:01 PM
(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

2025 हे वर्ष संपत असताना अमृता खानविलकरने तिच्या चाहत्यांना अनेक खास सरप्राईज दिले . एकीकडे नव्या वर्षात अमृता रंगभूमीवर पदार्पण करणार असून वर्ष संपत असताना नेटफ्लिक्स वरच्या एका नव्या कोऱ्या वेब सीरिज मध्ये ती मुख्य भूमिकेत झळकताना दिसणार आहे.

नेटफ्लिक्सवर येणाऱ्या ” तस्करी ” या वेब सीरिज मध्ये तिची विशेष लक्ष वेधून घेणारी भूमिका बघायला मिळणार असल्याचं कळतंय. तिच्या सोबतीने अनेक बॉलिवूडचे बडे कलाकार देखील तस्करी मध्ये काम करताना दिसणार आहेत. ” तस्करी ” मध्ये पहिल्यांदा अमृता आणि बॉलिवुड अभिनेता इम्रान हाश्मी यांची जोडी प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.

अमृताने सोशल मीडिया “तस्करी” चा टीझर शेयर केला असून तिच्या कॅप्शन ने लक्षवेधून घेतलं आहे. तस्करीच्या दुनियेत तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे असं म्हणत तिने हा टिझर सोशल मीडिया वर पोस्ट केला आहे. इम्रान सोबत तिची काय भूमिका साकारणार? या तस्करीच्या विश्वात अमृताचा काय रोल असणार हे बघण्यासाठी थोडी वाट बघावी लागणार आहे.

‘अरेss बहीण आहे त्याची…’, जय भानुशालीचा मिस्ट्री गर्लसोबत Video पाहून संतापली आरती सिंग; मीडियाला फटकारले

‘विश्वासच बसत नाहीये की वयाच्या ७१ व्या वर्षीही…’, रेखाचा परफॉर्मन्स पाहून चाहते थक्क; दिले Standing Ovation

वर्षभर नावीन्यपूर्ण प्रोजेक्ट्स मधून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अमृता वर्ष संपताना देखील त्यांचं निखळ मनोरंजन करणार यात शंका नाही ! तर येणाऱ्या वर्षात प्रेक्षक तिला रंगभूमीवर बघण्यासाठी देखील तितकेच उत्सुक असल्याचं बघायला मिळतंय.

अमृताने डान्स, चित्रपटातील विविध भूमिका,नच बलिये सारखे अनेक रिअॅलिटी शोमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. आता अभिनेत्री तब्बल वीस वर्षानंतर रंगभूमीवर परतणार आहे. अनेक मराठी आणि हिंदी चित्रपट गाजवल्यानंतर ही मराठी अभिनेत्री रंगभूमीवर काम करताना दिसणार आहे. लवकरच ती ’लग्न पंचमी’ या आगामी नाटकामध्ये तब्बल वीस वर्षानंतर मुख्य भूमिकेत काम करताना दिसणार आहे. या नाटकाचे लेखन मधुगंधा कुलकर्णी यांनी केले आहे. स्वप्नील जोशी अमृताबरोबर लग्न पंचमी या नाटकात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. अनेकांनी ‘जिवलगा’ मालिकेतील ही जोडी पुन्हा एकत्र पाहायला मिळाल्याचा आनंद व्यक्त केला आहे.

Web Title: Amruta khanvilkar and emraan hashmi to be seen together in taskari

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 15, 2025 | 02:01 PM

Topics:  

  • Amruta Khanvilkar
  • Bollywood News
  • Web Series

संबंधित बातम्या

Ishwar Thakur: ‘FIR’ फेम अभिनेता ईश्वर ठाकूरची मृत्यूशी झुंज; रुग्णालयात उपचार सुरू, कुटुंबीयांनी मागितली आर्थिक मदत
1

Ishwar Thakur: ‘FIR’ फेम अभिनेता ईश्वर ठाकूरची मृत्यूशी झुंज; रुग्णालयात उपचार सुरू, कुटुंबीयांनी मागितली आर्थिक मदत

Vikrant Massey Musafir Cafe: डोंगरांच्या कुशीत आकार घेतंय विक्रांत मैसींचं ‘मुसाफिर कॅफे’; बांधकामाची खास झलक समोर
2

Vikrant Massey Musafir Cafe: डोंगरांच्या कुशीत आकार घेतंय विक्रांत मैसींचं ‘मुसाफिर कॅफे’; बांधकामाची खास झलक समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.