(फोटो सौजन्य-Social Media)
बॉलीवूड अभिनेत्री अनन्या पांडे सध्या तिच्या ‘कॉल मी बे’ या वेब सीरिजच्या यशाचा आनंद घेत आहे. ही मालिका OTT प्लॅटफॉर्म Amazon Prime वर रिलीज झाली आणि चाहत्यांकडून आणि प्रेक्षकांकडून या मालिकेला खूप प्रशंसा मिळत आहे. स्टुडंट ऑफ द इयर 2 मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या या अभिनेत्रीने आता तिचे अभिनय कौशल्य खूप पुढे घेऊन गेली आहे. अभिनेत्रींना आता अनेक चित्रपटामध्ये काम करून चाहत्यांची मने जिंकली आहे.
लग्नाला उपस्थित राहण्यासाठी मिळाले होते पैसे?
आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्रीने अनंत-राधिकाच्या लग्नाबाबत सुरू असलेल्या अनेक अफवांना पूर्णविराम दिला आहे. अनंत आणि राधिकाचे लग्न याच वर्षी १२ जुलैला पार पडले. बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत आणि राजकारणी या भव्य लग्नाचा भाग होते. या लग्नात स्टार किड्सनीही खूप धमाल केली. अनंतच्या लग्नात अभिनेत्री खूप मज्जा मस्ती करताना दिसली होती. तेव्हापासून या लोकांनी लग्नात सहभागी होण्यासाठी पैसे घेतल्याची अफवा पसरली होती. आता अभिनेत्रीने या सर्व अफवांना पूर्णविराम दिला आहे.
अनन्या म्हणाली- “तो माझा मित्र आहे”
मॅशेबल इंडियाला दिलेल्या मुलाखतीत पैसे मिळण्याच्या प्रश्नावर अनन्या म्हणालीकी, “अनंत आणि राधिका दोघेही माझे मित्र आहेत. लोकांना असे का वाटते ते मला समजत नाही. मित्राच्या लग्नाला गेलो तर मनापासून नाचणार हे उघड आहे. मला आनंद साजरा करायला आवडतो.” असे तिने सांगितले.
यादरम्यान अनन्याने अनंत आणि राधिकाच्या केमिस्ट्रीबद्दलही सांगितले. अभिनेत्री म्हणाली की, “अनंत आणि राधिका जेव्हा जेव्हा एकमेकांना पाहतात तेव्हा त्यांच्यात खरे प्रेम दिसून येते. या लग्नाची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे सर्व पाहुण्यांचे मनापासून स्वागत करण्यात आले. एवढी फंक्शन्स असली तरी प्रत्येकाला स्पेशल वाटले होते.” असे अभिनेत्रीने सांगितले.
हे देखील वाचा- आमिर खानचा मुलगा श्रीदेवीच्या मुलीसोबत रोमान्स करणार, जुनैद- खुशीच्या नव्या चित्रपटाची घोषणा
पर्सनल लाईफबद्दल बोलायचे झाले तर अनन्या पांडे आदित्य रॉय कपूरसोबत खूप दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये होती. दोघेही अनेकदा एकत्र व्हेकेशनवर जाताना दिसले. तथापि, बॉम्बे टाईम्सच्या वृत्तानुसार, नंतर बातमी आली की आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडे मार्च 2024 मध्ये वेगळे झाले. ब्रेकअपनंतर आता ही अभिनेत्री वॉकर ब्लँकोला डेट करत असल्याची चर्चा आहे.