आमिर खानचा मुलगा श्रीदेवीच्या मुलीसोबत रोमान्स करणार, जुनैद- खुशीच्या नव्या चित्रपटाची घोषणा
जुनैद खान त्याच्या आगामी चित्रपटामध्ये दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीची छोटी मुलगी खुशी कपूरसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. अद्याप चित्रपटाचं नाव जाहीर करण्यात आलेलं नाही. सध्या तरी चित्रपटाचीच घोषणा करण्यात आलेली आहे. जुनैद आणि खुशी ह्या आगामी चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहे. शेअर केलेल्या पोस्टरमध्ये, पाठमोरी एक कपल बसलेलं दिसून येत आहे. यामध्ये, तरुणीने त्या तरुणाच्या खांद्यावर डोकं ठेवलेलं दिसत आहे. प्रेम, आवड आणि त्यातील इतर गोष्टी असं कथानक चित्रपटाचं आहे.
झी स्टुडिओज, एजीएस एन्टरटेन्मेंट आणि फँटम प्रॉडक्शन हाऊसच्या बॅनरखाली चित्रपटाची घोषणा करण्यात आलेली आहे. त्यासोबतच चित्रपटाची निर्मितीही त्यांनीच केलेली आहे. तर चित्रपटाचे दिग्दर्शन अद्वैत चंदन करणार आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी रिलीज होणार आहे. ७ फेब्रुवारी २०२५ ला जगभरातल्या बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट रिलीज होणार आहे. जुनैद आणि खुशीचा दोघांचाही हा दुसरा चित्रपट असेल. जुनैदने ‘महाराजा’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केलं आहे. तर खुशी कपूरने ‘आर्चिज’ चित्रपटातून फिल्म इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले.