गॅरेजमध्ये काम ते एव्हरग्रीन हिरो; हालाखीच्या दिवसांत राहिलेल्या अनिल कपूर यांचं 'या' चित्रपटाने पालटलं नशीब
बॉलीवूड इंडस्ट्रीतील दिग्गज अभिनेते अनिल कपूर यांनी वयाच्या ६७ व्या वर्षीही स्वत:ला पूर्णपणे तंदुरुस्त ठेवले आहे. फिटनेससाठी प्रसिद्ध असलेला हा अभिनेता सध्या चित्रपटांमध्ये सक्रिय आहे. आता अनिल कपूरने असे काही केले आहे ज्यामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. वास्तविक, अनिल कपूरने पान मसाला जाहिरात करण्याची ऑफर नाकारली आहे, ज्यासाठी त्यांना 10 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती. आपल्या चाहत्यांच्या आरोग्याशी खेळायचे नाही, हे त्याने सिद्ध केले आहे. अनेक कलाकार अशा जाहिराती करत असताना अनिल कपूरने या जाहिराती करण्यास नकार दिला आहे.
अनिल कपूरने एका झटक्यात ऑफरला मारली लाथ
मिळालेल्या माहितीनुसार, ‘एका मोठ्या पान मसाला कंपनीने अनिल कपूरला एक मोठी ऑफर दिली होती पण त्यांनी ती नाकारली आहे. अनिल कपूरला त्याच्या चाहत्यांसाठी ही जबाबदार वाटते की चाहत्यांचा आरोग्य सुरक्षित राहिले पाहिजे आणि लोकांच्या आरोग्याला हानी पोहोचेल अशा जाहिराती करू नये. त्यासाठी कितीही किंमत मोजावी लागली तरी त्या जाहिरातींना नकार दिला पाहिजे असे अभिनेत्याचे म्हणणे आहे. या स्टेपनंतर अनिल कपूरचे खूप कौतुक होत आहे. अनिल कपूर त्याच्या फिटनेसबाबत खूप जागरूक आहे आणि तो अनेकदा जिममध्ये मेहनत घेताना दिसत असतो. अक्षय कुमार, अजय देवगण, शाहरुख खान यांच्यासह बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्व स्टार्स पान मसाला कंपनीची जाहिरात करताना दिसले आहेत आणि यासाठी त्यांना खूप ट्रोल देखील करण्यात आले आहे.
हे देखील वाचा – आलिया भट्ट, सान्या मल्होत्रा ते जान्हवी कपूर पर्यंत या अभिनेत्रींनी कॉर्सेट साडीचा ट्रेंड केला सुरु!
अनिल कपूरचे आगामी चित्रपट
अनिल कपूरच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ते ‘वॉर 2’ आणि ‘अल्फा’ या चित्रपटात दिसणार आहे. अभिनेत्याला पुन्हा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी त्याचे चाहते आतुर झाले आहेत. तर अनिल कपूर शेवटचा ‘सावी’ चित्रपटात काम करताना दिसला होता. अनिल कपूरने यावर्षी ‘बिग बॉस ओटीटी 3’ होस्ट केले होते ज्यामुळे अभिनेत्याने चाहत्यांची मने जिंकली आहेत.