बिग बॉस ओटीटी 3 मध्ये एक वीकेंड वॉर होणार आहे, ज्यामध्ये पुन्हा अभिनेता आणि होस्ट अनिल कपूर स्टेजवर येतील आणि घरातील सदस्यांसोबत मज्जा करताना दिसणार असून त्यांची शाळासुद्धा घेताना प्रेक्षकांना दिसणार आहे. त्याचे अनेक प्रोमो सोशल मीडियावर समोर आले आहेत. एका प्रोमोमध्ये असे दिसून आले की होस्ट स्पर्धकांना एकमेकांची नक्कल करण्यास सांगतात. त्याच वेळी, दुसऱ्या प्रोमोमध्ये तो रणवीर आणि कृतिकाला अनेक प्रश्न विचारताना या प्रोमोमध्ये दिसून येत आहे.
शोमध्ये ‘गोलू’ आणि ‘गुड्डू’ची कथा दिसली
जिओ सिनेमाने आपल्या सोशल मीडिया हँडल इंस्टाग्रामवर वीकेंड का वारचे अनेक प्रोमो शेअर केले आहेत. पहिल्या प्रोमोमध्ये ‘गोलू’ आणि ‘गुड्डू’ची कथा पाहायला मिळणार आहे. गोलू म्हणजेच (कृतिका) आणि गुड्डू (अरमान) आहे. या दोघांचे अनेक खुलासे या वीकेंड का वार मध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. अशा परिस्थितीत शिवानी पहिल्यांदाच तिची नक्कल करताना प्रेक्षकांना दिसणार आहे.
ती विशालकडे जाते आणि तो असल्याचा आव आणते आणि म्हणते की आपण हलवा बनवू आणि खाऊ. यानंतर विशाल पांडे अरमानची नक्कल करतो. आणि मग अनिल कपूर रणवीरला शिवानीच्या जेवणाची नक्कल करायला सांगतो. हे सगळं आता येत्या वीकेंड का वार मध्ये पाहायला मिळणार आहे चाहत्यांना वेगळेच मनोरंजन पाहायला मिळणार आहे.
होस्ट रणवीर-कृतिकासोबत खेळ खेळताना दिसणार
यानंतर दुसऱ्या प्रोमोमध्ये दिसते की अनिल कपूर रणवीर आणि कृतिकासोबत गेम खेळताना दिसतात. अनिल कपूर रणवीरला म्हणतात की आज तुझा विद्यार्थी ठरवेल तुला किती जेवण मिळेल. मग होस्टने इंग्रजीमध्ये काही प्रश्न विचारले आणि कृतिकाला त्यांची उत्तरे देताना यामध्ये दिसत आहे. विचारलेल्या प्रश्नामध्ये दोन प्रश्न योग्य आणि एक चुकीचे आहेत. ज्यामुळे हे पाहायला आणखी मज्जा येणार आहे.
घरात येणार कुटुंब आणि मित्रमैत्रिणी
यावेळी स्पर्धकाच्या कुटुंबातील सदस्यांना वीकेंड का वार एपिसोडमध्ये पाहता येईल. अलीकडेच पायलने खुलासा केला होता की यावेळी ती आपल्या मुलांसह घरात प्रवेश करणार आहे आणि अरमान-कृतिकाला सपोर्ट करताना दिसणार आहे.व त्यामुळे हा वीकेंड का वार प्रेक्षकांसाठी खूप खास ठरणार आहे.