(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
बिग बॉस मराठी’ मधून घराघरात पोहोचलेली आणि ‘कोकण हार्टेड गर्ल’ म्हणून ओळख मिळवलेली अंकिता वालावलकर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर सक्रिय असलेली अंकिता तिच्या चाहत्यांना वेळोवेळी अपडेट्स देत असते.आता दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर अंकिताने एक गुडन्यूज शेअर करत चाहत्यांना आनंदित केलं आहे.
तिने आपल्या नव्या इनिंगची सुरुवात केल्याची माहिती सोशल मीडियावर पोस्टद्वारे दिली आहे.तिच्या या नवीन प्रवासाबद्दल अद्याप संपूर्ण माहिती समोर आलेली नसली तरी चाहत्यांकडून तिला भरभरून शुभेच्छा दिल्या जात आहेत. अनेकांनी तिला यशस्वी भविष्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
Bigg Boss 19: बिग बॉसच्या घरात नवा ड्रामा, अमाल आणि अभिषेक एकमेकांना भिडले; काय होईल याचा परिणाम?
अंकिताने दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर तिच्या पती कुणाल भगत याच्यासोबत मिळून ‘Mud Eye Studios’ नावाचं प्रोडक्शन हाऊस सुरू केल्याची घोषणा सोशल मीडियावर व्हिडीओच्या माध्यमातून केली आहे.. दसऱ्याच्या मुहुर्तावर कोकण हार्टेड गर्लने नव्या इनिंगला सुरुवात केली आहे. ‘मड आय स्टुडिओज’ असं अंकिता आणि कुणालच्या निर्मिती कंपनीचं नाव आहे. “प्रत्येक मोठ्या स्वप्नाला लागतो शुभारंभाचा क्षण…आणि तो क्षण आम्हाला मिळतोय आज, दसऱ्याच्या या मंगलदिनी मी आणि कुणाल आमचं स्वतःचं प्रोडक्शन हाऊस सुरू करत आहोत. दोन क्रिएटिव्ह डोकी एकत्र आली की भन्नाट काहीतरी घडणार हे नक्की!”, असं अंकिताने पोस्टमध्ये म्हटलं आहे.
अखेर स्वप्नांची नगरी मुंबईत अभिनेत्री मीरा जोशीचं ‘स्वतःचं घर’ झालं साकार
अंकिताच्या या पोस्टवर चाहत्यांकडून प्रचंड शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अनेकांनी तिच्या क्रिएटिव्ह दृष्टीकोनाचं कौतुक केलं आहे आणि तिच्या या नव्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.दरम्यान, अंकिता आणि कुणालने फेब्रुवारी २०२५ मध्ये विवाहबंधनात अडकत त्यांच्या आयुष्याची नवी सुरुवात केली होती. कुणाल भगत हा पेशाने एक गायक आणि संगीतकार असून तो देखील क्रिएटिव्ह क्षेत्रात सक्रिय आहे.“दोन क्रिएटिव्ह डोकी एकत्र आली की भन्नाट काहीतरी घडणार, हे नक्की!” असं म्हणत अंकिताने त्यांच्या प्रोडक्शन हाऊससाठीच्या स्वप्नांची सुरुवात दसऱ्याच्या या मंगलदिनी केली आहे.