(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
चित्रपट निर्माता-दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी अलीकडेच एका जाती समुदायावर आक्षेपार्ह टिप्पणी केली. त्यांच्या या टिप्पणीवरून बराच वादंग निर्माण झाला असून अनुराग कश्यपवर टीका होत आहे. अनुराग कश्यपलाही आता त्याची चूक कळली आहे, त्यानंतर त्याने माफी मागितली आहे. अनुराग कश्यपने आज मंगळवारी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आणि लिहिले की, ‘रागात मी माझ्या मर्यादा विसरलो’. आता या पोस्टला नेटकऱ्यांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.
काय म्हणाला अनुराग कश्यप?
अनुराग कश्यपने आज मंगळवारी त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्याने लिहिले की, ‘रागाच्या भरात एखाद्याला उत्तर देताना मी माझ्या मर्यादा विसरलो. आणि मी संपूर्ण ब्राह्मण समाजाबद्दल वाईट बोलला. समाज, ज्यातील अनेक लोक माझ्या आयुष्याचा एक भाग राहिले आहेत, ते अजूनही तिथे आहेत आणि खूप योगदान देत आहेत. आज ते सर्व माझ्यामुळे दुखावले आहेत. माझ्यामुळे माझ्या कुटुंबाला त्रास झाला आहे. मी ज्यांचा आदर करतो अशा अनेक बुद्धिजीवी माझ्या रागामुळे आणि माझ्या बोलण्याच्या पद्धतीमुळे भावना दुखावल्या गेल्याची मी माफी मागतो, तसेच मी माझ्या रागावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करेल, मला आशा आहे की तुम्ही मला माफ कराल.’ असं चित्रपट निर्माता अनुरागने म्हटलं आहे.
‘मी मनापासून माफी मागतो’ – अनुराग
अनुराग कश्यप पुढे लिहितात, ‘मी या समाजाची मनापासून माफी मागतो ज्यांना मी हे सांगू इच्छित नव्हतो, पण एखाद्याच्या हलक्या कमेंटला उत्तर देताना रागाच्या भरात ते लिहिले.’ मी माझ्या सर्व मित्रांची, माझ्या कुटुंबाची आणि समाजाची माझ्या बोलण्याच्या पद्धतीबद्दल आणि अपशब्दांबद्दल माफी मागतो. मी त्यावर काम करेन जेणेकरून ते पुन्हा घडू नये. मी माझ्या रागावर काम करेन. जर मला या विषयावर बोलायचे झाले तर मी योग्य शब्द वापरेन. मला आशा आहे की तुम्ही मला माफ कराल.’
ईडीने साउथ सुपरस्टार Mahesh Babu ला बजावले समन्स, कोणत्या प्रकरणात अडकला अभिनेता?
नेटकऱ्यांनी म्हटले- ‘आत्मनिरीक्षण’
अनुराग कश्यपच्या या पोस्टवर युजर्स प्रतिक्रिया देत आहेत. त्यांच्या माफी मागण्याच्या निर्णयाचे नेटिझन्स कौतुक करत आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले, ‘आत्मनिरीक्षण.’ दुसऱ्या एका वापरकर्त्याने लिहिले, ‘अशी माफी मागणे ही तुमची महानता आहे.’ एका वापरकर्त्याने लिहिले की, ‘चूक मान्य करणे आणि ती सर्वांनी स्वीकारणे ही खूप मोठी गोष्ट आहे.’ तथापि, काही वापरकर्ते अनुरागला ट्रोलही करत आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले, ‘सोशल मीडियावर तुमची वैयक्तिक निराशा व्यक्त करणे टाळा.’ सर्वांना एकाच तराजूत तोलू नका.