(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
साऊथ सुपरस्टार महेश बाबू यांच्याशी संबंधित मोठी बातमी समोर आली आहे. ईडीने महेश बाबूला समन्स बजावले आहेत. अभिनेत्याला २७ एप्रिल रोजी हैदराबाद ईडी कार्यालयात हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले आहे. ही बातमी समोर येताच, अभिनेत्याचे चाहतेही चिंतेत पडले की ईडीने महेशला कोणत्या प्रकरणात समन्स पाठवले आहे. हे संपूर्ण प्रकरण काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत.
संपूर्ण प्रकरण काय आहे?
अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) हैदराबादस्थित रिअल इस्टेट फर्म साई सूर्या डेव्हलपर्स आणि सुराणा ग्रुपशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अभिनेता महेश बाबूला २७ एप्रिल रोजी चौकशीसाठी समन्स बजावले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या कंपन्यांद्वारे चालवल्या जाणाऱ्या रिअल इस्टेट प्रकल्पांना प्रोत्साहन दिल्याबद्दल महेश बाबूची चौकशी सुरू आहे. साई सूर्या डेव्हलपर्सच्या जाहिरातीसाठी महेश बाबूला ५.९ कोटी रुपये देण्यात आल्याचे ईडीच्या सूत्रांचे म्हणणे आहे; अधिकृत बँकिंग चॅनेलद्वारे ३.४ कोटी रुपये आणि कथितपणे २.५ कोटी रुपये रोख स्वरूपात होते.
‘कल्याणच्या चुलबुली’च्या हॉट अंदाजाने नेटकऱ्यांची उडाली झोप…
महेश बाबूला मोठी रक्कम देण्यात आली
साई सूर्या डेव्हलपर्सच्या जाहिरातीसाठी महेश बाबूला ५.९ कोटी रुपये देण्यात आल्याचे ईडीच्या सूत्रांचे म्हणणे आहे; ३.४ कोटी रुपये अधिकृत बँकिंग चॅनेलद्वारे देण्यात आले आणि २.५ कोटी रुपये रोख स्वरूपात देण्यात आल्याचा आरोप आहे. तथापि, महेश बाबू या समन्सवर उपस्थित राहतात की नाही हे पाहणे बाकी आहे. तसेच, अभिनेत्या या सगळ्या प्रकरणावर काय प्रतिसाद देतो हे पाहणे उत्कंठाचे ठरणार आहे.
‘माझ्या स्वप्नांचे दरवाजे…’, निक जोनासला वयाच्या १३ व्या वर्षी झाला होता ‘हा’ गंभीर आजार!
महेश बाबू SSMB 28 मध्ये व्यस्त
याशिवाय, या सुपरस्टार अभिनेत्याबद्दल सांगायचे झाले तर, महेश बाबू सध्या त्याच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दलही चर्चेत आहे. महेश बाबू सध्या त्यांच्या आगामी ‘ssmb 28’ या चित्रपटात व्यस्त आहेत. हा चित्रपट प्रसिद्ध दिग्दर्शक एसएस राजामौली दिग्दर्शित करत आहेत. या चित्रपटात महेशसोबत ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा देखील दिसणार आहे. चित्रपटाचे चित्रीकरणही सुरू आहे. आणि आता चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.