फोटो सौजन्य - Social Media
अभिनेत्री अपेक्षा पोरवालने आपल्या खास अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. तिच्या अभिनय कौशल्याची भुरळ चाहत्यांवर पडली आहे. तिने २०२४ मध्ये अनेक उत्कृष्ट भूमिका साकारल्या आहेत. अभिनेत्रीचे प्रत्येक पात्र आणि मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस आले आहेत. याचदरम्यान नजर टाकुयात अभिनेत्रीच्या चार साकारलेल्या दमदार पात्रांवर जे प्रेक्षकांना खूप आवडले.
1) ‘स्लेव मार्केट’ मध्ये भारतीय राजकुमारी
अपेक्षा ने इंग्रजी-अरबी सीरीज ‘स्लेव मार्केट’ मध्ये एक भारतीय राजकुमारीची भूमिका साकारली आहे. तिच्या उत्कृष्ट अदाने आणि अभिनय कौश्यल्याने आंतरराष्ट्रीय शोमध्ये छाप सोडली. तिचे हे पात्र प्रेक्षकांच्या लक्षात राहिले. ही मालिका प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन करणारी आहे. या मालिकेला चाहत्यांचा भरभरून प्रतिसाद मिळाला आहे.
Bigg Boss 18 : नॉमिनेशनमध्ये विवियन डिसेना घरातल्या सदस्यांच्या निशाण्यावर! म्हणाले – तुझं अस्तित्व…
२) ‘उंदेखी’ मध्ये बहादुर आदिवासी मुलगी
‘उंदेखी’ मालिकेमधून अपेक्षा पोरवालने हिंदी वेब सिरीजमध्ये पदार्पण केले. या मालिकांमध्ये तिने धाडसी आदिवासी मुलीची भूमिका साकारली आहे. सामाजिक लढा आणि संघर्षाची लढाई यावर आधारित सत्य उघड करणारी ही कथा आहे. या मालिकेला ओटीटीवर चाहत्यांनी खूप प्रतिसाद दिला.
३) ‘हनिमून फोटोग्राफर’ जबरदस्त भूमिका
‘हनिमून फोटोग्राफर’ या ओटीटी मालिकेमध्ये अपेक्षा पोरवालने जोया ईरानीची भूमिका साकारली आहे. जी तिच्या सुरु असलेल्या आयुष्यात येणाऱ्या अडचणीत अडकते. ही मालिका एक थ्रिलर स्वरूपात आहे. प्रेक्षकांना या मधील अभिनेत्रीचा अभिनय खूपच अडवला आहे. तसेच चित्रपटाची कथा देखील जबरदस्त आहे.
४) ‘बधाई दो’ अनोखे पात्र
‘बधाई दो’ मध्ये, अपेक्षाने सामाजिक नियमांशी लढा देणाऱ्या समलैंगिक महिलांची भूमिका साकारली आहे. भूमी पेडणेकर आणि आयुष्मान खुराणा हे दोघे या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत दिसत आहेत. अभिनेत्रीने तिची भूमिका उत्कृष्ट पद्धतीत साकारली आहे. तिचे हे पात्र प्रेक्षकांच्या मनात घर करून गेले आहे. हा चित्रपट भरभरून मनोरंजन आणि प्रेक्षकांना आवडणारा आहे.
तीव्र नाटकांपासून ते हलक्या-फुलक्या कथांपर्यंत आणि अगदी आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडण्यापर्यंत, अपेक्षा पोरवालचा आतापर्यंतचा प्रवास प्रेरणादायी आहे. तिच्या जबरदस्त अभिनय आणि उत्कृष्ट पत्राने ती अनेकवेळा प्रेक्षकांचं मन जिंकत आली आहे. आणि तिचे अष्टपैलुत्व सिद्ध केले आहे. अभिनेत्री लवकरच नवीनवर्षात तिच्या नवनवीन प्रोजेक्ट मध्ये दिसले आणि चाहत्यांचा भरपूर मनोरंजन करेल अशी आशा आहे.