फोटो सौजन्य - सोशल मीडिया
बिग बॉस 18 नॉमिनेशन : नुकताच शनिवारी आणि रविवारी विकेंडचा वॉर झाला यामध्ये सलमान खानने घरातल्या सदस्यांची शाळा घेतली. यामध्ये सलमान खानने नुकताच घराबाहेर झालेला दिग्विजय राठीच्या एव्हिक्शनवर प्रश्न उपस्थित केले होते. जसजसा फिनाले येत आहे तसतसा बिग बॉसच्या घरातल्या सदस्यांच्या लोकप्रियतेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या विकेंडच्या वॉरला करणवीर मेहराच्या चाहत्यांनी एक ट्रेंड चालवला होता यामध्ये १० लाखाऊन अधिक ट्विट करून त्यांनी नवा रेकॉर्ड तयार केला होता. आता आगामी भागाचा नवा प्रोमो आला आहे यामध्ये आज बिग बॉसच्या घरामध्ये नॉमिनेशन होणार आहेत.
Bigg Boss 18 : दिग्विजयच्या एव्हिक्शनमुळे करण-चमच्या नात्यात दुरावा, म्हणाला- तो 25 वर्षांचा मुलगा…
बिग बॉस 18 च्या संदर्भात सोशल मीडियावर बरीच चर्चा आहे. या शोबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता झपाट्याने वाढत आहे. शो आता वेगाने फिनालेकडे वाटचाल करत आहे. अशा परिस्थितीत स्पर्धकांमधील स्पर्धा खूपच तीव्र झाली आहे. घरातले स्पर्धक विजय मिळवण्यासाठी तो नातेसंबंधांचाही विचार करत नाही. अशा परिस्थितीत दिग्विजय सिंह यांना नुकतेच त्यांच्याच मित्रांनी दगा दिल्याने त्यांना घरातून हाकलण्यात आले आहे. त्याचवेळी आता घराघरात पुन्हा नॉमिनेशन युद्ध सुरू झाले आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना स्पर्धक एकमेकांना नॉमिनेट करताना दिसले.
बिग बॉस 18 चा नवा प्रोमो आला आहे. या प्रोमोमध्ये घरातील सदस्य एकमेकांना नॉमिनेट करताना दिसत आहेत. प्रोमोच्या सुरुवातीला, कशिश कपूर विवियनवर शाब्दिक हल्ला करताना दिसणार आहे यावेळी ती म्हणते की, ‘तो कधीही त्याचे मत पुढे मांडत नाही, यासाठी त्याला सर्वांनी वेळोवेळी सांगितले आहे. जर शिल्पाने त्याला टाइम गॉड बनवले नसते आणि चाहत त्याच्यासोबत भांडली नसती तर तो संपूर्ण शोमध्ये कुठेही दिसला नसता.
Promo #BiggBoss18 Nominations#VivianDsena is show me sirf apna nam chala rhe, individuality nahi pic.twitter.com/12AuPl8nTr
— The Khabri (@TheKhabriTweets) December 23, 2024
कशिशचे म्हणणे ऐकून विवियन म्हणतो, ‘मी काय करत आहे हे मला माहीत आहे. तू काय करत आहेस ते तुला माहीत आहे.’ यावर कशिश म्हणते की, ‘तुझ्यापेक्षा जास्त.’ विवियन म्हणाला, ‘तू तुझं जास्त लक्ष तुझ्याकडे ठेव, मी माझ्या गोष्टींवर खुश आहे.’ कशिश म्हणते की तुम्ही व्हिव्हियन डिसेना हे नाव चालवत आहात, वैयक्तिक व्यक्तिमत्व नाही. कशिशशिवाय चुम दरंग आणि रजत दलाल यांनीही विवियनला नॉमिनेट केले. तर शिल्पा शिरोडकर यांनी अविनाश मिश्राला नॉमिनेशनमध्ये टाकल्याचे दिसून येत आहे.
Avinash ke pyaar par uth rahe hai sawaal. 🤨
Dekhiye #BiggBoss18, aaj raat 10 baje, sirf #Colors aur @JioCinema par.@bellavita_org #Vaseline @Parle2020cookie #ChingsSecret #Harpic #GoCheese#BiggBoss18 #BiggBoss #BB18@Avinash_galaxy @KaranVeerMehra @rajat_9629 pic.twitter.com/XsdexOHtRg
— ColorsTV (@ColorsTV) December 23, 2024