(फोटो सौजन्य - x अकाउंट)
अभिनेते देब मुखर्जी गेल्या काही काळापासून प्रकृतीच्या समस्यांमुळे त्रस्त होते. आज म्हणजेच १४ मार्च रोजी त्यांच्या निधनाची बातमी समोर आली आणि संपूर्ण चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. अभिनेते देब हे बॉलिवूड दिग्दर्शक अयान मुखर्जी यांचे वडील आणि आशुतोष गोवारीकर यांचे सासरे आहेत. यावेळी, अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी देब मुखर्जी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दिग्दर्शक अयान मुखर्जी यांच्या घरी पोहोचत आहेत. तसेच याचवेळी ‘ब्रह्मास्त्र’ फेम आलिया भट्ट आणि रणबीर कपूर एकत्र दिसले आहेत.
रणबीर आणि आलिया अयानच्या दुःखात सामील झाले
आज रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या घरी होळीचा सण साजरा होत होता. पण दोघांनाही अयान मुखर्जीच्या वडिलांच्या निधनाची बातमी मिळताच ते महोत्सव सोडून दिग्दर्शकाच्या घरी पोहचले आहेत. रणबीर आणि आलिया हे दिग्दर्शक अयान मुखर्जीचे जवळचे मित्र आहेत. तिघांनीही ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटात एकत्र काम केले आहे. तसेच हा चित्रपट ब्लॉकब्लस्टर झाला आहे.
Deb Mukherjee: ‘ब्रह्मास्त्र’चे दिग्दर्शक अयान मुखर्जी यांच्या वडिलांचे निधन, काजोलशी होते खास नाते!
काजोल-करण जोहर देखील पोहचले
काजोल आणि अयान मुखर्जी हे नातेवाईक आहेत. देब मुखर्जी हे काजोलचे काका आहेत. अभिनेत्री काजोलही अयानचे वडील आणि तिच्या काकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी त्याच्या घरी पोहोचली आहे. काजोल व्यतिरिक्त, निर्माता करण जोहरची कार देखील अयानच्या घराबाहेर दिसली आहे. या कठीण काळात तो अयानसोबत उभा आहे. तसेच आता अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी देब मुखर्जी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी त्याच्या घरी पोहचत आहेत.
किशोर कुमारचा मुलगा भावनिक दिसत होता
किशोर कुमार यांचे पुत्र अमित कुमार देखील देब मुखर्जी यांना अंत्यदर्शन देण्यासाठी पोहोचले. यावेळी तो खूप भावनिक दिसत होता. त्याचे डोळे ओले दिसत होते. अयान मुखर्जीच्या कुटुंबातील इतर अनेक लोकही देब मुखर्जी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पोहोचत आहेत. या बातमीने सिनेमासृष्टीत शोककळा पसरली आहे. होळीच्या दिवशी या दुखत बातमीने निराश केले आहे.