(फोटो सौजन्य - x अकाउंट)
बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीमधून एक दुःखद बातमी समोर आली आहे. अभिनेते देब मुखर्जी यांचे निधन झाले आहे. देब मुखर्जी हे दिग्दर्शक अयान मुखर्जीचे वडील होते. आता त्यांनी या जगाचा निरोप घेतला आहे. अचानक आलेल्या या बातमीने सर्वांनाच चिंता वाटली आहे. अयान मुखर्जीसाठी हा कठीण काळ आहे. तसेच या बातमीने सगळीकडे शोककळा पसरली आहे.
देब मुखर्जी बऱ्याच काळापासून आजारी होते आणि आज म्हणजेच १४ मार्च रोजी सकाळी त्यांनी वयाच्या ८३ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. आज दुपारी ४ वाजता त्यांचे अंतिम संस्कार केले जाणार आहे. त्यांचे अंतिम संस्कार मुंबईतील जुहू परिसरातील पवन हंस स्मशानभूमीत केले जातील. सध्या त्यांचे पार्थिव त्यांच्या घरी आहे. आज १४ मार्च होळीच्या दिवशी बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीमधून ही दुःखद बातमी समोर आली आहे जी ऐकून चाहते निराश झाले आहे, संपूर्ण इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली आहे.
काजोलशी होते त्यांचे खास नातं
त्याचे प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री काजोलशीही संबंध होते. खरंतर, ते काजोलच्या काकासारखे होते. काजोल त्यांना काकाचा दर्जा देत होती. ‘लगान’ सारखे अनेक उत्तम चित्रपट बनवणारे आशुतोष गोवारीकर हे देब मुखर्जी यांचे जावई आहेत. देब मुखर्जी यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले होते. इंडस्ट्रीतील लोक त्यांना देबू दा म्हणून ओळखत होते.
२ मार्च रोजी देब मुखर्जी यांचे नातू आणि आशुतोष गोवारीकर यांचे पुत्र कोणार्क गोवारीकर यांचे लग्न झाले. आजारपणामुळे देब हे लग्नाला उपस्थित राहू शकले नाही. या लग्नात शाहरुख खानसह चित्रपटसृष्टीतील अनेक स्टार्स उपस्थित होते.
देब मुखर्जी यांचे चित्रपट
देब मुखर्जी यांनी ‘तू ही मेरी जिंदगी’, ‘आंसू बन गए फूल’, ‘अभिनेत्री’, ‘दो आंखें’, ‘बंधू’ यासह अनेक चित्रपटांमध्ये काम केले होते. ते पडद्यावर त्याचे पात्र अत्यंत साधेपणाने साकारत असे. लोकांना ते पडद्यावर काम करताना खूप आवडायचे. देब मुखर्जी यांना दोन मुले आहेत. पहिले अयान मुखर्जी आणि दुसरे सुनीता मुखर्जी, जे नंतर सुनीत गोवारीकर झाल्या. सुनीता यांचे लग्न आशुतोष गोवारीकर यांच्याशी झाले आहे. देब मुखर्जी यांच्या निधनाच्या बातमीने बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. लोक त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत.