(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
बॉलिवूड अभिनेता अजय देवगण सध्या त्याच्या आगामी ‘सिंघम अगेन’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. दरम्यान, अजय देवगणच्या आगामी ‘आझाद’ या चित्रपटाचा टीझर लाँच करण्यात आला आहे. या सिनेमाद्वारे अजय देवगण रवीना टंडनची मुलगी रशा थडानी आणि त्याचा भाचा अमान देवगणला लाँच करत आहे.
हे देखील वाचा – ‘पुष्पा 2’ चे नवीन पोस्टर रिलीज, अल्लू अर्जुन अन् फहद फासिलचा समोर आला खतरनाक लुक!
तरण आदर्शने शेअर केला ‘आझाद’चा टीझर
‘आझाद’चा हा टीझर चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. या चित्रपटात महाराणा प्रताप यांची कथा दाखवण्यात आली आहे. हल्दीघाटीची लढाई या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. अभिनेत्री रवीना टंडनची मुलगी रशा थडानी आणि अजय देवगणचा भाचा अमान देवगण या चित्रपटामध्ये रोमँटिक अंदाजात दिसणार आहे. ‘आझाद’ चित्रपटामध्ये प्रेमकथा दाखवण्यात आली आहे. चित्रपटाचा टीझर खूपच अप्रतिम दिसत आहे. अभिषेक कपूर दिग्दर्शित ‘आझाद’ या चित्रपटाची रिलीज डेटही समोर आली आहे. हा चित्रपट जानेवारी 2025 मध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा टीझर लोकांना खूप आवडला आहे.
AJAY DEVGN – AAMAN DEVGAN – RASHA THADANI: ‘AZAAD’ TEASER OUT NOW… JAN 2025 RELEASE… Ahead of its release in Jan 2025, director #AbhishekKapoor unveils the striking teaser of his forthcoming film #Azaad, an action-adventure.#AzaadTeaser 🔗: https://t.co/1mtgphVQHz
Stars… pic.twitter.com/nl4BlQhcVG
— taran adarsh (@taran_adarsh) November 5, 2024
या चित्रपटामध्ये अभिनेता अजय देवगण, रशा थडानी आणि अभिनेत्याचा भाचा अमान देवगण मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ‘आझाद’ चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक कपूर यांनी केले आहे, ज्याने यापूर्वी केदारनाथ, काई पो चे आणि रॉ ऑन सारखे अनेक सुपरहिट चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आणले आहेत.
हे देखील वाचा – अखेर ठरलं ! रामचरणच्या ‘Game Changer’ चा टीझर केव्हा रिलीज होणार ?
कधी रिलीज होणार आझाद?
चित्रपटाचे पोस्टर आता नुकतेच रिलीज झालेला टिझर पाहिल्यानंतर ‘आझाद’च्या चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. या चित्रपटामध्ये नक्की काय दाखवणार हे पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत. विशेष म्हणजे अजय देवगणच्या उपस्थितीमुळे या चित्रपटाला अधिक वजन मिळत आहे. अमान देवगणचा डेब्यू सिनेमा आझादच्या रिलीज डेटवर नजर टाकली तर हा सिनेमा पुढच्या वर्षी जानेवारी महिन्यात चित्रपटगृहात दाखल होणार आहे. यातून प्रेक्षकांना सिनेमाचा एक नवा साहस रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. स्पष्टपणे सांगायचे झाले तर नवीन वर्षाची सुरुवात ‘आझाद’ चित्रपटाच्या रिलीजने धमाकेदार होणार आहे.