Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 1 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अजय देवगण यांच्या दमदार आवाजात ‘शतक – संघ के १०० वर्ष’ ट्रेलर रिलीज; जाणून घ्या कधी होणार चित्रपट प्रदर्शित

अजय देवगण ‘शतक’साठी निवेदकाच्या भूमिकेत प्रेक्षकांना दिसणार आहे. ‘शतक - संघ के १०० वर्ष’ या चित्रपटाचा नुकताच ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. तसेच हा चित्रपट नक्की कधी प्रदर्शित होणार जाणून घेऊयात.

  • By सायली ससाणे
Updated On: Feb 13, 2026 | 12:29 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • अजय देवगण यांच्या दमदार आवाजात ‘शतक’ चा ट्रेलर
  • जाणून घ्या कधी होणार चित्रपट प्रदर्शित
  • ‘शतक – संघ के १०० वर्ष’ काय आहे चित्रपटाची कथा?
 

‘शतक – संघ के १०० वर्ष’ या चित्रपटाचा बहुप्रतीक्षित ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून या ट्रेलरला बॉलीवूड सुपरस्टार अजय देवगण यांच्या प्रभावी आणि भारदस्त आवाजाची साथ लाभली आहे. त्यांच्या दमदार निवेदनामुळे चित्रपटाची पहिली झलकच प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवणारी ठरत आहे. ट्रेलरमधून चित्रपटाची भव्यता, भावनिक गहिरेपणा आणि गंभीर आशय यांचा स्पष्ट अंदाज येतो आहे.

‘Alpha’च्या सेटवर एकमेकांना भिडले आलिया आणि बॉबी; दिग्दर्शक आदित्य चोप्राने घेतला मोठा निर्णय

त्याग, चिकाटी आणि ‘राष्ट्र प्रथम’ या मूल्यांवर आधारलेला हा चित्रपट राष्ट्रीय स्वयंसेवक संघच्या शंभर वर्षांच्या प्रवासाचा मागोवा घेतो. गुरुजी मा. स. गोळवलकर यांच्या विचारसरणीवर आणि संघाच्या चिरंतन तत्त्वांवर आधारित हा शतकीय प्रवास विविध ऐतिहासिक संदर्भ, दस्तऐवज आणि घटनांच्या आधारे मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. इतिहासातील काही न सांगितलेल्या गोष्टी किंवा न सांगितलेल्या अध्यायांकडे एका विशिष्ट दृष्टिकोनातून पाहण्याचा प्रयत्न या चित्रपटात दिसून येत आहे. भगव्या रंगाच्या प्रभावी प्रतीकात्मक मांडणीमुळे या संकल्पनेला अधिक ठळक आणि दृश्यात्मक प्रभाव प्राप्त झाला आहे.

 

चित्रपटाचा भाग असल्याबद्दल अजय देवगण यांनी आपली भावना व्यक्त करत म्हटले की, “राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शंभर वर्षांच्या प्रवासाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन. एक शतक हे केवळ कालगणनेतील टप्पा नसून, ते पिढ्यान् पिढ्यांच्या बांधिलकी, त्याग आणि राष्ट्रनिर्मितीतील योगदानाचे प्रतीक आहे. या शंभर वर्षांत संघाने सेवा, एकात्मता आणि सांस्कृतिक ओळख यांविषयीच्या चर्चांना आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ‘शतक’ हा या दीर्घ प्रवासावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न आहे. माझ्यासाठी या कथेला आवाज देणे हा खरोखरच सन्मान आहे. ही केवळ एका संस्थेची गोष्ट नाही, तर एका विचाराची कथा आहे, जी काळाच्या ओघात अनेक आव्हानांना सामोरे जात ठामपणे उभी राहिली. जिद्द, श्रद्धा आणि सामूहिक ध्येय यांविषयी बोलणाऱ्या या कथेला माझा आवाज देणे ही अत्यंत अर्थपूर्ण अनुभूती आहे.”

‘एकदम बाप चित्रपट…’, शाहिद- तृप्तीच्या केमिस्ट्रीने वेधले लक्ष; समोर आला O’Romeo चा पहिला Review

पॅनोरमा यांच्या सहयोगाने साकारलेल्या या चित्रपटाची निर्मिती वीर कपूर यांनी केली असून दिग्दर्शनाची धुरा आशिष मल्ल यांनी सांभाळली आहे. सह-निर्माते म्हणून आशिष तिवारी यांचा सहभाग आहे. संशोधनाधारित मांडणी, प्रभावी दृश्यभाषा आणि दमदार निवेदन यांचा संगम असलेला ‘शतक – संघ के १०० वर्ष’ हा चित्रपट २० फेब्रुवारी २०२६ रोजी देशभरातील चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.

 

Web Title: Shaatak trailer out ajay devgn narrates 100 year journey of the rashtriya swayamsevak sangh rss article

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 13, 2026 | 12:29 PM

Topics:  

  • Ajay Devgn
  • Bollywood
  • entertainment

संबंधित बातम्या

Exclusive: अनुप जलोटा डरबनमध्ये करणार ऐतिहासिक 2,70,000 हनुमान चालीसा पठण, अनुजा सहाय देणार साथ
1

Exclusive: अनुप जलोटा डरबनमध्ये करणार ऐतिहासिक 2,70,000 हनुमान चालीसा पठण, अनुजा सहाय देणार साथ

Vijaya Mehta: रंगभूमी झाली पोरकी, ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शिका विजया मेहता यांचे निधन
2

Vijaya Mehta: रंगभूमी झाली पोरकी, ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शिका विजया मेहता यांचे निधन

Aamir Khan Lagaan: ऑस्करपर्यंत मजल मारणाऱ्या ‘लगान’च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; टपाल विभागाकडून गौरव
3

Aamir Khan Lagaan: ऑस्करपर्यंत मजल मारणाऱ्या ‘लगान’च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; टपाल विभागाकडून गौरव

अरे देवा! चक्क ५ वीच्या पुस्तकात छापलं ऐश्वर्या रायचं ‘निंबुडा-निंबुडा’ गाणं; शिक्षण विभागाच्या अजब कारभाराची जोरदार चर्चा
4

अरे देवा! चक्क ५ वीच्या पुस्तकात छापलं ऐश्वर्या रायचं ‘निंबुडा-निंबुडा’ गाणं; शिक्षण विभागाच्या अजब कारभाराची जोरदार चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.