'पुष्पा २' सर्वांपर्यंत पोहोचणार, दिव्यांगांसाठी केलीये निर्मात्यांनी 'अशी' व्यवस्था
साउथ इंडस्ट्रीतील बहुप्रतिक्षित ‘पुष्पा 2’ या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहिली जात आहे. अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ चित्रपटाचा पहिला भाग 2021 साली प्रदर्शित झाला होता आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता आणि तेव्हापासून त्याच्या दुसऱ्या भागाची मागणी सुरू झाली होती. आता अखेर ‘पुष्पा २’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 6 डिसेंबरला चित्रपटगृहात दाखल होणाऱ्या या चित्रपटाचे नवीन पोस्टर समोर आले आहे. यात अल्लू अर्जुन आणि फहद फासिल दिसत आहेत आणि त्यांची स्टाइल लोकांना उत्तेजित करणारी आहे.
हे देखील वाचा – ‘भुल भुलैय्या ४’ पण येणार ? स्वत: कार्तिक आर्यनने दिली हिंट
‘पुष्पा’ चित्रपटातही अल्लू अर्जुन आणि फहद फासिल या दोघांची अनोखी स्टाईल पाहायला मिळाली होती परंतु आता रिलीज झालेले नवीन पोस्टर पाहून चाहत्यांची चित्रपटात बघण्याची आतुरता शिगेला पोहचली आहे. हा पोस्टर शेअर करताना निर्मात्यांनी लिहिले की, ‘स्वतःला तयार करा – वर्षातील सर्वात मोठा भारतीय चित्रपट एक महिन्यानंतर चित्रपटगृहात तुफान गाजणार आहे.’ असे लिहून ही पोस्ट शेअर केली आहे. तसेच हा नवीन पोस्टर पाहून चाहत्यांनी या पोस्टला चांगलाच प्रतिसाद दिला आहे. आणि पोस्टवर कंमेंटचा वर्षाव करत आहेत.
One month to go for #Pushpa2TheRule ❤🔥
Prepare yourself – THE BIGGEST INDIAN FILM of the year is set to take the theaters by storm in a month 💥💥#Pushpa2 TRAILER EXPLODING SOON 🌋🌋#1MonthToGoForPushpa2RAGE#Pushpa2TheRuleOnDec5th pic.twitter.com/W3ts1VtyUT
— T-Series South (@tseriessouth) November 5, 2024
‘पुष्पा 2’ची चर्चा होत आहे
‘पुष्पा 2’च्या प्रत्येक अपडेटने लोकांमध्ये चित्रपटाशी संबंधित उत्सुकता वाढवली आहे. अल्लू अर्जुन पुन्हा एकदा लाल चंदनाची तस्करी करताना आणि पोलीस आणि त्याच्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करताना दिसणार आहे. याआधीच्या चित्रपटात ‘पुष्पराज’ या व्यवसाय वाढताना दिसला होता, तर ‘पुष्पा २’मध्ये तो राजाप्रमाणे राज्य करताना दिसणार आहे. हा चित्रपटामध्ये अनेक मोठे स्टारकास्ट दिसणार आहेत. तसेच अल्लू अर्जुन आणि फहद फासिल व्यतिरिक्त रश्मिका मंदान्ना देखील मुख्यभूमीकेत झळकणार आहे.
हे देखील वाचा – ‘आय वॉन्ट टू टॉक’; घटस्फोटाच्या अफवांदरम्यान अभिषेकच्या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, जिंकले चाहत्यांचे मन!
‘छावा’ला टक्कर देणार ‘पुष्पा २’
Mythri Movie Makers च्या प्रोडक्शन हाऊस अंतर्गत ‘पुष्पा 2’ रिलीज होणार आहे. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर विकी कौशलच्या ‘छावा’ चित्रपटाला टक्कर देणार आहे. दोन्ही चित्रपट ६ डिसेंबरला प्रदर्शित होत आहेत. अशा परिस्थितीत कोण कोणावर मात करणार हे पाहणे उत्साहाचे ठरणार आहे.