'गेम चेंजर'च्या निर्मात्यांकडून ४५ जणांविरोधात तक्रार दाखल, नेमकं कारण काय ?
मेगास्टार रामचरण (Ram Charan) आणि कियारा अडवाणी (Kiara Advani) स्टारर ‘गेम चेंजर’ (Game Changer) चित्रपटाबद्दल महत्वाची अपडेट समोर आली आहे. या तेलुगू चित्रपटाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली असून टीझरचीही रिलीज डेट आता समोर आली आहे. २०२५ च्या सुरूवातीलाच ‘गेम चेंजर’ चित्रपट थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. चित्रपट रिलीज होण्यासाठी अजून दोन महिन्यांहून अधिक कालावधी शिल्लक असला तरी, आताच चित्रपटाची जोरदार चर्चा होत आहे. ‘गेम चेंजर’ हा पॉलिटिकल थ्रिलर चित्रपट असून गेल्या अनेक दिवसांपासून रामचरण आणि कियारा अडवाणीचे चाहते या चित्रपटासाठी उत्सुक आहेत.
हे देखील वाचा – ‘पुष्पा 2’ चे नवीन पोस्टर रिलीज, अल्लू अर्जुन अन् फहद फासिलचा समोर आला खतरनाक लुक!
‘गेम चेंजर’ हा चित्रपट एक पॅन इंडिया तेलगू चित्रपट आहे, जो हिंदीसह तेलुगू आणि तमिळ भाषेत प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाची शूटिंग पूर्ण झाल्यानंतर निर्माते चित्रपटाच्या प्रमोशनला सुरू करणार आहेत. दिवाळीच्या मुहूर्तावर, ‘गेम चेंजर’च्या निर्मात्यांनी चित्रपटाची रिलीज डेट जाहीर केली असून टीझरचीही तारीख जाहीर केली आहे. रामचरण आणि कियारा अडवाणी स्टारर ‘गेम चेंजर’ चित्रपट १० जानेवारी २०२५ ला जगभरात रिलीज होणार आहे, तर या चित्रपटाचा टीझर ९ नोव्हेंबर २०२४ ला रिलीज केला जाणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, निर्माते चित्रपटाचा टीझर लाँचिंग इव्हेंट करणार असून यावेळी निर्माते, दिग्दर्शक आणि चित्रपटातील स्टारकास्टही उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे.
चित्रपटाचा टीझर उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये प्रदर्शित होणार असल्याची माहिती मीडिया रिपोर्ट्समध्ये सांगितले जात आहे. चित्रपटाचं शुटिंग पूर्ण झाल्यानंतरचा हा पहिलाच इव्हेंट असणार आहे. या टीझर लाँचिंग इव्हेंटला राम चरण स्वतः पोहोचणार असून तेथे उपस्थित माध्यमांशीही चित्रपटाबद्दल संवाद साधणार आहे. राम चरण आणि कियारा व्यतिरिक्त, गेम चेंजरमध्ये श्रीकांत अंजली, एसजे सूर्या, नवीन चंद्रा आणि समुतिराकणी सारखे कलाकार दिसणार आहेत.मीडिया रिपोर्टनुसार, ‘गेम चेंजर’ चित्रपटाच्या साऊथ व्हर्जनचे ओटीटी राइट्स ‘ॲमेझॉन प्राईम व्हिडीओ’ने १०५ कोटींना विकत घेतले आहेत. तर हिंदी व्हर्जनचे ओटीटी राईट्स ‘झी ५’ विकत घेतले आहेत.
चित्रपटाचे दिग्दर्शन एस. शंकर करत असून चित्रपटात रामचरणसह कियारा अडवाणी ही प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. दिल राजू आणि शिरीष या चित्रपटाचा निर्माते आहेत. चित्रपट तयार करण्यासाठी निर्मात्यांनी चित्रपटावर पाण्यासारखा पैसा खर्च केला आहे. मिडिया रिपोर्ट्सनुसार, निर्मात्यांनी चित्रपटाच्या गाण्यांवर ४० ते ५० कोटी रुपये खर्च केले आहेत. इतकंच नाही तर, चित्रपटामध्ये ट्रेनचा एक ॲक्शन सीन आहे, जो सुमारे ७ मिनिटांचा असणार आहे. केवळ त्या सीन्ससाठी निर्मात्यांनी तब्बल किंमत ७० कोटी रुपये खर्च केल्याचे बोलले जात आहे. चित्रपटाची निर्मिती २५० कोटी रुपयांमध्ये झाली आहे. राम चरणच्या ह्या मोस्ट अवेटेड चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.