(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
बॉलिवूड स्टार किड्स चित्रपटांमध्ये येणे ही काही नवीन गोष्ट नाही. अलिकडेच रवीना टंडनची मुलगी राशा थडानी आणि अजय देवगणचा पुतण्या अमन देवगणने ‘आझाद’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. जरी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकला नाही, तरी चित्रपटातील राशाचा नृत्य आणि अभिनय चाहत्यांना खूप आवडला आहे. तसेच आता गोविंदाचा मुलगा यशवर्धनही बॉलिवूड चित्रपटांमध्ये आपले नशीब आजमावणार आहे. तो लवकरच चाहत्यांचा मनोरंजन करण्यासाठी सज्ज होणार आहे.
गोविंदाचा मुलगा यशवर्धन आहुजा आणि बाबिल एका चित्रपटात एकत्र काम करू शकतात अशी माहिती समोर आली आहे. यशवर्धन आहुजा साई राजेश दिग्दर्शित आगामी अनटाइटल रोमँटिक ड्रामामध्ये दिसू शकतात असे वृत्त आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, चित्रपटात आणखी एक स्टार किड देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसू शकतो. आणि तो म्हणजे बाबिल खान. बाबिल खान हा दिवंगत अभिनेता इरफान खान यांचा मुलगा आहे. तो देखील आता मोठ्या पडद्यावर लवकरच पदार्पण करणार आहे.
खरंतर, चित्रपट निर्मात्यांना त्यांच्या रोमँटिक चित्रपटासाठी नवीन चेहरे हवे आहेत, त्यामुळे बाबिल खान आणि यशवर्धन आहुजा यांना कास्ट करण्याची योजना आखली जात आहे. अल्लू अरविंद आणि एसकेएन फिल्म्स यांच्या सहकार्याने मधु मंटेना निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन साई राजेश करणार आहेत, जे कलर फोटो, हृदय कलेयम आणि बेबी सारख्या उत्कृष्ट तमिळ चित्रपटांसाठी ओळखले जातात. आता ते लवकरच नव्या कलाकारांना घेऊन प्रेक्षकांच्या समोर येणार आहेत.
तथापि, चित्रपटातील मुख्य अभिनेत्रीचा शोध अजूनही सुरू आहे ज्यासाठी कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा देशभरात अभिनेत्री शोधत आहेत आणि त्यांना या चित्रपटासाठी १४,००० हून अधिक ऑडिशन व्हिडिओ आधीच मिळाले आहेत. बाबिल आणि यशवर्धन यांच्यासमोरील मुख्य महिला नायिका लवकरच निश्चित केली जाणार आहे, कारण हा प्रकल्प २०२५ च्या उन्हाळ्यापर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे.
तथापि, चित्रपटाची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. १ मार्च १९९७ रोजी जन्मलेला यशवर्धन आहुजा हा बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता गोविंदा आणि सुनीता आहुजा यांचा मुलगा आहे. त्याला एक मोठी बहीण, टीना आहुजा आहे, तिनेही अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले होते पण तिची कारकीर्द फारशी यशस्वी झाली नाही. बाबिलबद्दल बोलायचे झाले तर, त्याने २०२२ मध्ये आलेल्या ‘काला’ या सायकॉलॉजिकल ड्रामा चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. अन्विता दत्त दिग्दर्शित या चित्रपटात तृप्ती डिमरी आणि स्वस्तिका मुखर्जी यांनीही मुख्य भूमिका साकारल्या होत्या. हे ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाले होते.