(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
गेल्या वर्षी ‘कन्नप्पा’ या दक्षिणेकडील चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. आता अखेर चित्रपटातील प्रत्येक अभिनेत्याचा लूक सातत्याने समोर येत आहे. विष्णू मंचूपासून ते माता पार्वतीच्या भूमिकेतील काजल अग्रवालचा लूकही समोर आला आहे. आणि आज काही काळापूर्वीच, महादेवाच्या रुद्र अवतारातील अक्षय कुमारचा लूक प्रदर्शित झाला आहे. या लूकसोबतच चित्रपटाची रिलीज डेटही जाहीर झाली आहे. या चित्रपटाचे पोस्टर खूप आकर्षित दिसत आहे. तसेच या पोस्टरने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.
अक्षय कुमार सध्या त्याच्या आगामी ‘स्काय फोर्स’ चित्रपटामुळे सतत चर्चेत आहे. अभिनेत्याचा हा चित्रपट लवकरच सिनेमागृहात दाखल होणार आहे. आता याच दरम्यान, आज चित्रपट निर्मात्यांनी अभिनेत्याचा दक्षिणेकडील चित्रपट कन्नप्पामधील अक्षय कुमारच्या लूकचे पोस्टर रिलीज केले आहे, ज्यामुळे हे स्पष्ट होते की अक्षय कुमार चित्रपटात महादेवच्या भूमिकेत दिसणार आहे. अभिनेत्याच्या या लूकने प्रेक्षकांना चकित केले आहे. अभिनेत्याचा पोस्टरमधील रुद्र अवतार पाहून प्रेक्षकांना या चित्रपटाची उत्सुकता लागली आहे.
अक्षय कुमारचा कन्नप्पा चित्रपटातील पूर्ण लूक प्रदर्शित झाला आहे. अभिनेता कन्नप्पा चित्रपटामध्ये महादेवच्या भूमिकेत दिसणार आहे. पोस्टरमध्ये खिलाडी कुमार एका हातात त्रिशूळ आणि दुसऱ्या हातात डमरू धरलेला दिसत आहे. तसेच त्याच्या कपाळावर राख आहे. अभिनेत्याला महादेवच्या अवतारात पाहून त्याचे चाहते खूप आनंदी झाले आहेत. या चित्रपटापूर्वी अक्षयने ‘ओह माय गॉड’ चित्रपटात भगवान शिवची भूमिका साकारली होती. जी खूप प्रसिद्ध झाली. आणि आता लवकरच अभिनेता दक्षिणेकडील चित्रपट कन्नप्पामध्ये हा अवतार पुन्हा साकारणार आहे.
कन्नप्पाचा लूक शेअर करताना अक्षय कुमारने इंस्टाग्रामवर लिहिले, “कन्नप्पासाठी महादेवाच्या पवित्र आभामध्ये पाऊल ठेवत आहे. ही महाकाव्यकथा जिवंत करण्याचा सन्मान मिळाला आहे. भगवान शिव आपल्याला या दिव्य प्रवासात मार्गदर्शन करोत. ओम नमः शिवाय.”असे लिहून अभिनेत्याने या पोस्टरचे अनावरण केले आहे. तसेच हे पोस्टर आणि अभिनेत्याला लुक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मोहन बाबू निर्मित ‘कन्नप्पा’ मध्ये विष्णू मंचू मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. भगवान शिववर आधारित या पौराणिक चित्रपटात प्रभास, अक्षय कुमार, मोहनलाल, सरथकुमार, मधु, मोहन बाबू, काजल अग्रवाल आणि ब्रह्मानंदन हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट यावर्षी २५ एप्रिल रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची कथा आणि कलाकारांचे पात्र पाहण्यासाठी चाहते खूप आतुर आहेत.