Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

डान्स रिॲलिटी शो ते ‘किल’मधील उत्कृष्ट कामगिरी; जाणून घ्या राघव जुयालचा मनोरंजन विश्वातील प्रवास

राघव जुयाल हा एक अभिनेता, डान्सर आणि त्यासोबतच शो होस्टदेखील आहे. राघवच्या डान्स स्टाईलशिवाय राघवच्या विनोदी स्वभावामुळेसुद्धा तो सर्वांना फार आवडतो. त्याने आपल्या ऑनस्क्रीन कारकिर्दीची सुरुवात रिॲलिटी टीव्ही शोमधून केली आणि आता अलीकडेच प्रदर्शित झालेल्या त्याच्या 'किल' या हिंदी चित्रपटातील त्याच्या अभिनयासाठी जगभरात त्याचे कौतुक होत आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jul 19, 2024 | 02:06 PM
डान्स रिॲलिटी शो ते 'किल'मधील उत्कृष्ट कामगिरी जाणून घ्या राघव जुयालचा मनोरंजन विश्वातील प्रवास

डान्स रिॲलिटी शो ते 'किल'मधील उत्कृष्ट कामगिरी जाणून घ्या राघव जुयालचा मनोरंजन विश्वातील प्रवास

Follow Us
Close
Follow Us:

राघव जुयाल हा एक अभिनेता, डान्सर आणि त्यासोबतच शो होस्टदेखील आहे. राघवच्या डान्स स्टाईलशिवाय राघवच्या विनोदी स्वभावामुळेसुद्धा तो सर्वांना फार आवडतो. राघवनेच पहिल्यांदा स्लो मोशन डान्स स्टाईलची ओळख लोकांना करून दिली. राघवची स्लो मोशन वॉक तर पूर्ण भारतात लोकप्रिय आहे. इतकेच नव्हे तर तो भारतातील स्लो मोशनचा किंग म्हणून प्रसिद्ध आहे. राघव सर्वांसाठी एक युथ आयकॉन आणि प्रेरणादायी डान्सर बनला आहे. त्याने आपल्या ऑनस्क्रीन कारकिर्दीची सुरुवात रिॲलिटी टीव्ही शोमधून केली आणि आता अलीकडेच प्रदर्शित झालेल्या त्याच्या ‘किल’ या हिंदी चित्रपटातील त्याच्या अभिनयासाठी जगभरात त्याचे कौतुक होत आहे. भारतीय अभिनेता राघव जुयालच्या कौशल्यामुळे त्याला जगभरातून प्रेम मिळत आहे.

कीलचा प्रीमियर

किलचा प्रीमियर गेल्या वर्षी टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात झाला आणि तेव्हापासून तो जगभरात धुमाकूळ घालत आहे. तसेच तो गेल्या महिन्यात ट्रायबेका फिल्म फेस्टिव्हलमध्येही गेला होता. हा चित्रपट 87 इलेव्हन एंटरटेनमेंट आणि लायन्सगेट द्वारे इंग्रजी रीमेकसाठी देखील तयार आहे. हे तेच आहेत ज्यांनी यापूर्वी जॉन विक चित्रपटांसोबत कोलॅबोरेट केलं होत.

कधी झाला चित्रपट प्रदर्शित

किल 5 जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. कल्की 2898 AD हा बिग-बजेट चित्रपट त्यावेळी चित्रपटगृहांमध्ये जास्त चालला होता. परंतु गुनीत मोंगाच्या किलने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली. अक्षय कुमारचा सरफिरा आणि कमल हसनचा हिंदुस्तानी 2 रिलीज झाल्यानंतरही या चित्रपटाने चित्रपटगृहांमध्ये प्रवेश मिळवणे सुरूच ठेवले आहे आणि बॉक्स ऑफिसवर दोन आठवड्यांत $4 दशलक्ष पेक्षा जास्त कमाई केली आहे.

कसे आहे राघवाचे ऍक्टिंग करियर

किलमध्ये काम करण्यापूर्वी राघव जुयालने ABCD 2 आणि स्ट्रीट डान्सर 3D सह अनेक चित्रपटांमध्ये काम केले. राघवने एका मुलाखतीत किलच्या बॉक्स ऑफिसवरील कामगिरीबद्दल भूमिकेसाठी त्याची तयारी आणि प्रेरणा याबद्दल सांगितले आहे. आणि त्याच्या वडिलांनी त्याला या व्यक्तिरेखेबद्दल सहानुभूती दाखवण्यास सांगितले आणि ते पात्र अधिक मजेदार कसे बनावता येईल हे देखील सांगितले.

फनी या किल मधील पात्राची कशी केली त्याने तयारी

राघव एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला,’ मला वाटते की एखाद्या अभिनेत्याने चित्रपटांचे संदर्भ घेणे धोकादायक आहे. कारण मग ते एक अभिनेता म्हणून त्यांचे व्यक्तिमत्व गमावून बसतात. एखाद्या व्यक्तिरेखेसाठी चित्रपट पाहण्यापेक्षा डॉक्युमेंट्री पाहणे चांगले असते, असे मला वाटते. मी खूप मानसिक तयारी केली. मी दिग्दर्शकासोबत बसलो आणि त्यांच्याशी बोललो. त्यांना अनेक प्रश्न विचारले जसे की, ‘हे पात्र धार्मिक आहे की नाही?’  कोणीतरी म्हटलं की जर हिथ लेजर हॉलीवूडमध्ये असेल तर भारतात राघव जुयाल आहे. ही एक चांगली तुलना आहे आणि माझ्यासाठी प्रशंसा आहे. मला खूप लोक भेटले आहेत ज्यांनी माझे कौतुक केले आहे. अनुराग कश्यप सरांनी मला मेसेज केला आणि सांगितले की मी दमदार अभिनय केला आहे. मुंबईत परतल्यानंतर मला भेटणार असल्याचेही त्यांनी सांगितले. आता माझ्यासाठी अनेक दरवाजे उघडत आहेत. बरं वाटतं. कुणीतरी म्हटलं की मी या वर्षाचा खलनायक आहे.

चित्रपटाची बॉक्स ऑफिस कामगिरी

किल हा कल्की 2898 एडी सारखाच चित्रपट आहे ज्याचे बजेट $20-30 दशलक्ष होते. हा छोट्या बजेटचा चित्रपट आहे. कल्कीमध्ये अमिताभ बच्चन, दीपिका पदुकोण आणि प्रभाससारखे मोठे स्टार्स आहेत. तरीही हा चित्रपट प्रेक्षकांना चित्रपटगृहात आणण्यासाठी सक्षम आहे. नुकताच अक्षय कुमारचा नवीन चित्रपट सरफिरा रिलीज झाला आहे. आणि कमल हसन देखील इंडियन 2 घेऊन आला आहे. त्यामुळे चित्रपटगृहाचे पडदे आणखी विभागले गेले आहेत. तरीही किल सारखा छोटा चित्रपट लोकांना पाहावासा वाटतो ही विशेष गोष्ट आहे.

राघवचा तो डायलॉग

किलमधील राघवचा तो डायलॉग फारच लोकप्रिय ठरला ज्यात तो म्हणतो, ‘हम डाकैत है, कोई अमिताभ बच्चन नहीं म्हणजे ‘आम्ही खलनायक आहोत, अमिताभ बच्चन नाही.’ हा भाग त्याच्या स्क्रिप्टमधे लिहला होता. परंतु राघवने शूटिंगदरम्यान त्यात एक लाईन वाढवली. ‘उसूलों की बलियां चढा रहे हैं’ हा भाग त्याने स्वतः जोडला. हा डायलॉग स्क्रिप्टमधे नव्हता पण त्याने सेटवर सादर करताना हा म्हटलं आणि लोकांनाही तो फार आवडला.

 

Web Title: Best performance in dance reality show to kill movie know raghav juyals journey in the entertainment world nrhp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 19, 2024 | 02:06 PM

Topics:  

  • Raghav Juyal

संबंधित बातम्या

राघव जुयालने साक्षी मलिकच्या कानशिलात मारली? Viral Video; नक्की प्रकरण काय…
1

राघव जुयालने साक्षी मलिकच्या कानशिलात मारली? Viral Video; नक्की प्रकरण काय…

बाबिल खानच्या धक्कादायक विधानानंतरही राघव जुयालने दिला पाठिंबा; काय म्हणाला अभिनेता?
2

बाबिल खानच्या धक्कादायक विधानानंतरही राघव जुयालने दिला पाठिंबा; काय म्हणाला अभिनेता?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.