फोटो सौजन्य - सोशल मीडिया
बिग बॉस १८ च्या घरामध्ये मारहाणी : सोशल मीडियावर चर्चेत असलेला टेलिव्हिजनवरचा वादग्रस्त रिऍलिटी शो बिग बॉस १८ ची सध्या चर्चचा भाग आहे. सोशल मीडियावर असो किंवा भारतीयांच्या घरामध्ये प्रसिद्ध रिऍलिटी शो पहिला जातो यावर प्रेक्षक त्यांची सोशल मीडियावर मत देखील शेअर करत असतात. आता या बिग बॉस १८ चा सध्या दहावा आठवडा सुरु आहे. घरामध्ये अजूनही १४ स्पर्धक शिल्लक आहेत. आता हा बिग बॉसचा खेळ जसजसा फिनालेच्या जवळ येत आहे तसतसा खेळ अधिकच मनोरंजक होत चालला आहे. भारतीय प्रेक्षकांना घरांमधील सदस्य भरपूर मनोरंजन करत आहे. रोज नवनवीन घरामध्ये बिग बॉस त्याच्या सदस्यांना सरप्राईझ देत असतात.
कालच्या भागामध्ये काही पत्रकार आणि दिग्दर्शक लेखक अनुराग कश्यप घरामध्ये सदस्यांना प्रश्न विचारण्यासाठी आला होता. यामध्ये विवियन डिसेना, शिल्पा शिरोडकर आणि चुम दारंग यांना प्रश्न करण्यात आले आहेत. आता आगामी भागामध्ये अनेक मोठे पत्रकार घरातील सदस्यांना त्याच्या वैयत्तिक आयुष्यावर त्याचबरोबर खेळांमधील विषयांवर चर्चा करताना दिसणार आहे आणि स्पर्धकांना आरसा दाखवणार आहेत. आता याच घटनेवरून घरामध्ये नवा वाद आगामी एपिसोडमध्ये पाहायला मिळणार आहे.
बिग बॉस 18 बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा
‘बिग बॉस 18’ चे घर रणांगण बनत आहे. कुटुंबातील सदस्यांमध्ये छोट्या-छोट्या गोष्टींवरून भांडण होत आहे. लाइव्हफीडनुसार पार्ले-जी टास्क घरात होता. दिग्विजय राठी ने हा टास्क जिंकला आहे आणि यावेळी त्याला पार्ले-जी बिस्किटे मिळवतात. ईशा सिंग जेव्हा त्याचे एक बिस्किट उचलते तेव्हा दिग्विजय म्हणतो, ‘मागून घ्या.’ याच मुद्द्यावरून अविनाश मिश्रा आणि दिग्विजय यांच्यात भांडण सुरू होते.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या प्रोमोमध्ये आता बिस्किटचे कारण म्हणजे दिग्विजय आणि अविनाश यांच्यातील जोरदार कडाक्याचा वाद पाहायला मिळणार आहे. यावेळी रजत दलाल, अविनाश मिश्रा आणि विवियन डिसेना हे तिघेही दिग्विजय राठीवर हात उचलताना दिसत आहेत. अविनाश मिश्राने आणि रजत दलालने दिग्विजय राठीची कॉलर पकडताना प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. दिग्विजय पुन्हा अविनाशला धक्का देतो आणि नंतर रजत दलालवर स्टेटमेंट पास करतो.
Promo #BiggBoss18 tomorrow pic.twitter.com/iOrItkjbeQ
— The Khabri (@TheKhabriTweets) December 4, 2024
दिग्विजयचे म्हणणे ऐकून रजतला राग येतो आणि तो दिग्विजयला मारण्यासाठी धावतो. अशा परिस्थितीत करणवीर मेहरा आणि इतर घरांमधील सदस्यांनी मध्यस्थी करून दिग्विजयला मारहाण होण्यापासून वाचवले. ही काही पहिली वेळ नाही. याआधीही अविनाश आणि दिग्विजय यांच्यात बाचाबाची झाली होती. टाइम गॉड टास्कमध्ये अविनाशने दिग्विजयला जमिनीवर ढकलले होते. मात्र, त्यावेळी बिग बॉसने दोघांवरही कोणतीही कारवाई केली नाही किंवा त्यांना कन्फेशन रूममध्ये बोलावून काहीही सांगितले नाही. अशा परिस्थितीत बिग बॉस यावेळी काय करते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.