फोटो सौजन्य - Jio Cinema सोशल मीडिया
बिग बॉस 18 : काल बिग बॉस १८ सीझनचा अकराव्या आठवड्याचा विकेंडचा वॉर झाला. ‘बिग बॉस 18’ चे विकेंडचा वॉर खूपच स्फोटक होता. शनिवारी सलमान खान त्याच्या संतप्त अवतारात दिसला आणि त्याने घरातल्या सदस्यांची शाळा देखील घेतली. कुठेतरी सलमानला दिग्विजय सिंह राठीच्या घराबाहेर काढल्याबद्दल खूप वाईट वाटत आहे असे कालच्या भागामध्ये दिसून आले आहे. दिग्विजयच्या एलिमिनेशनवर सलमानने चुम दारंग आणि शिल्पा शिरोडकर यांना प्रश्न केला की त्यांनी श्रुतिकाला वाचवण्यासाठी तुम्ही दोघी का बोलले नाही. अशा परिस्थितीत, आता बिग बॉस सोडण्यापूर्वी दिग्विजयचा शेवटचा संदेश व्हायरल होत आहे, जो त्याने घरातील सदस्यांना आणि प्रेक्षकांना दिला आहे.
अलीकडेच दिग्विजय सिंह राठी यांना बिग बॉस १८ मधून बाहेर काढण्यात आले. त्याच्या एलिमिनेशनमुळे स्वतः सलमान खानलाही धक्का बसला आहे. अशा परिस्थितीत आता दिग्विजय यांनी बिग बॉसच्या घरातून बाहेर जाण्यापूर्वी शेवटचा संदेश दिला आहे. दिग्विजयचा एक व्हिडीओ जिओ सिनेमाने त्याच्या ऍप आणि सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्याने स्पष्ट सांगितले आहे. यावेळी दिग्विजय म्हणतो, २४ तासांमधील १६ तास जेव्हा एकाच घरामध्ये राहतात तेव्हा तुमची नक्की नाती तयार होतात आणि त्यावेळी मी एकच विचार करत होतो की या घराबाहेर मी कधी पडणार आहे.
वरून धवन करणार विवियन आणि करणवीरवर प्रश्नांचा मारा! करणच्या उत्तरावर लाडल्याचे प्रत्युत्तर
पुढे त्याने सांगितले की, जेव्हा मी या घरामध्ये गेलो होतो वाईल्ड कार्ड म्हणून तेव्हा बऱ्याच गोष्टी वाईल्ड होत्या. त्या घरामध्ये अशा व्यक्तीला भेटलो ज्या व्यक्तीला मी आधीपासून ओळखत होतो. मी जबरदस्तीची नाती नाही बनवू शकत पण त्या घरामध्ये बऱ्याच लोकांनी दाखवण्यासाठी नाती तयार केली आहेत. ज्याप्रकारे तिथे नाती दाखवत आहे तेवढी ती खरी नाही नाही आहेत. रजत दलाल सोबत जे काही माझं नातं राहील आहे एक वेळ पर्यत ते खूप सकारात्मक होतं पण त्यानंतर बऱ्याच घटना घडल्या त्यानंतर मला वाटलं की जर त्याच्या मनात खोटेपणा आहे तर मग त्यामुळे ते नंतर पुढे जाऊन मला महागात पडेल.
पुढे दिग्विजय म्हणाला की, चुम खूप माझ्या जवळची झाली होती, त्याचबरोबर करणसोबत बसणं एवढी आमची दोघांची संभाषण झाली आहेत हे दोघे त्याचबरोबर चाहत. हे खरंच मला वाटत की खूप चांगली माणसं आहेत. ‘ज्या 11 लोकांना मी बाहेर भेटायला कधीच आवडणार नाही, त्यांना बघायला आवडणार नाही. माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण ४८ दिवस जगल्यानंतर मी परत येत आहे. मला असे वाटते की प्रत्येकजण घरामध्ये अभिनय करत आहे. मलाही ट्रॉफी उचलताना पाहायचे होते. जर कोणी बिग बॉस ट्रॉफीसाठी पात्र असेल तर तो आहे विवियन डिसेना कारण तो “लाडला” आहे’.
Bigg Boss 18 ke ghar se bahar aa kar Digvijay ne express kiye apne emotions. Bataya inhone kaun hain trophy ka haqdaar, aur kaise hai gharwalon ke relations.🔥
Dekhiye #BiggBoss18 @ColorsTV aur #JioCinema par. pic.twitter.com/14HW76myHD
— JioCinema (@JioCinema) December 21, 2024