फोटो सौजन्य - सोशल मीडिया
बिग बॉस 18 विकेंडचा वॉर : कालच्या शनिवारच्या विकेंडचा वार फारच मनोरंजक राहिला. यामध्ये सलमान खानने घरच्या सदस्यांना आरसा दाखवला. या आठवड्यामध्ये अनेक टास्क झाले आणि या टास्कदरम्यान घरातल्या सदस्यांमध्ये मोठे वादही पाहायला मिळाले. यामध्ये सर्वात मोठे वाद हे करणवीर मेहरा आणि रजत दलाल यांच्यामध्ये पाहायला मिळाला. या दोघांमध्ये टास्कदरम्यान एक घटना झाली आणि यामध्ये करणवीर मेहराच्या तोंडाला मोठी दुखापत झाली आहे आणि त्यामुळे त्याच्या तोंडाला मार लागला आहे. आता आगामी भागामध्ये पुन्हा एकदा दोघेही भिडताना दिसणार आहेत. त्याचबरोबर शोमध्ये विवियन डिसेनाची पत्नी त्याला फीडबॅक देण्यासाठी येणार आहे त्याचबरोबर रजत दलालची आई सुद्धा घरामध्ये एंट्री करणार आहे.
Bigg Boss 18 : विवियन डिसेनाची पत्नी आणि रजत दलालची आई करणार घरात एंट्री! नात्यांमध्ये होणार बदल
यानंतर सलमान खान घरातल्या सदस्यांना टास्क देणार आहे यामध्ये कोणाच्या डोक्याचा मेंदूची घंटी तुम्हाला वाजवायची आहे हे सांगायचे आहे. यावर करण म्हणतो, ‘मला रजतच्या डोक्यावरची घंटा वाजवायची आहे. प्रत्येक टास्कमध्ये तू तोडफोड केली आहे मी हे करून दाखवणारच कारण मी खूप शक्तिशाली आहे. मग असे असेल तर ये मी तर समोरून बोलत आहे! शक्तिशाली खली येऊन या घरामध्ये राहून गेला आहे. त्याच्याहून पण मोठा आहेस का तू? नाही ना. भाई (सलमान खान) च्या समोर तू भाऊ भाऊ करतो पण पुन्हा तू फाडून टाकेल. काही नाही करू शकत तू. आता पुढील आठवड्यामध्ये या दोघांमध्ये आणखी शत्रुत्व वाढेल असे समोरून दिसत आहे.
BIGG BOSS 18 PROMO : #VivianDsena Aur Nouran Huye Emotional, Nouran Ne Kiya Cheer up#WeekendKaVaar #BiggBoss18 pic.twitter.com/fgYh8sMCWq
— BiggBoss24x7 (@BB24x7_) December 14, 2024
यावेळी रिॲलिटी शोमध्ये 6 स्पर्धकांना नामांकन देण्यात आले होते, ज्यात करणवीर मेहरा, विवियन डिसेना, एडिन रोज, दिग्विजय राठी, चाहत पांडे आणि तजिंदर बग्गा यांच्या नावांचा समावेश होता. त्याच वेळी, बिग बॉसने मध्यंतरी एक टास्क दिला, ज्यामध्ये नामांकित सदस्य स्वतःला घरातून बाहेर काढण्यापासून वाचवू शकले आणि यामध्ये करणवीर मेहरा वाचला. यानंतर 5 स्पर्धकांच्या डोक्यावर तलवार टांगलेली होती. आता शोमधून एका व्यक्तीचा प्रवास संपला आहे आणि तो म्हणजे तजिंदर बग्गा. गेल्या अनेक आठवड्यांपासून तजिंदर बग्गा यांना घरातून बाहेर काढण्यासाठी नामनिर्देशित केले जात होते, परंतु प्रत्येक वेळी तो बचावला होता. त्याचवेळी ‘बिग बॉस’च्या रिपोर्टनुसार तो शोमधून बाहेर पडल्याचे बोलले जात आहे. अशा परिस्थितीत प्रेक्षकही खूप खूश झाले आहेत आणि ते म्हणतात की अखेर ही व्यक्ती बाहेर पडली आहे.
एका यूजरने कमेंट करत म्हटलं की, शेवटी, शेवटी आणि आता सारालाही काढून टाकलं पाहिजे. दुसऱ्याने लिहिले की नाही, आता बिग बॉसमध्ये कोण चहा बनवेल? तिसऱ्या वापरकर्त्याने लिहिले की बग्गा जी अखेर बाहेर पडले, मला माहित नाही की निर्मात्यांनी त्यांना 10 व्या आठवड्यापर्यंत कसे ठेवले.