फोटो सौजन्य - कलर्स सोशल मीडिया
बिग बॉस 18 : चर्चेत असलेला टेलिव्हिजनवरचा वादग्रस्त रिऍलिटी शो बिग बॉस 18 सध्या सोशल मीडियावर कहर करत आहे. बिग बॉसच्या घरामधील सदस्य प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहेत. बिग बॉस 18 च्या वीकेंडच्या वार भागात, सलमान खानने चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी काही टास्क सेट केले होते. या टास्कदरम्यान अविनाश मिश्रा आणि दिग्विजय राठी यांनी या स्पर्धेत भाग घेतला. या टास्क दरम्यान चाहत पांडे आणि अविनाश मिश्रा यांच्यात कडाक्याचे भांडण पाहायला, ज्यांना ते घराची साइड किक मानतात. यादरम्यान सलमान खानने आपल्या वर्तनाबद्दल माफी मागितली. या टास्कमध्ये अनेक घरातील सदस्यांनी एकमेकांवर निशाणा साधला आहे.
बिग बॉस 18 संबंधित बातमीसाठी येथे क्लिक करा
आता येणाऱ्या आगामी भागामध्ये आणखी प्रेक्षकांचे मनोरंजन होणार आहे. मागील तीन आठवड्यापासून चर्चेत असलेला सर्वाधिक बिग बॉसचा स्पर्धक म्हणजेच करणवीर मेहरा. सध्या बिग बॉसच्या घरामधील चित्र पाहिलं तर करणवीर मेहराच्या विरोधात संपूर्ण घर आहे. सोशल मीडियावर कलर्सने एक प्रोमो प्रदर्शित केला आहे. कलर्सने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये संपूर्ण घर करणवीर मेहराच्या विरोधात आहे.
शेअर करण्यात आलेल्या प्रोमोमध्ये आगामी भागात आज नॉमिनेशनचा टास्क होणार आहे. यामध्ये सर्वाधिक सदस्य करणवीर मेहरावर निशाणा साधणार आहे. नॉमिनेशन टास्कमध्ये या आठवड्यात रजत दलाल, अविनाश मिश्रा, सारा खान आणि विवियन डिसेना यांनी करणवीर मेहराला नॉमिनेट केले आहे.
Karan Veer aur Edin ka face off, ban gaya hai maamla thoda rough. 🫣
Dekhiye #BiggBoss18, Mon-Fri raat 10 baje aur Sat-Sun 9:30 baje, sirf #Colors aur @JioCinema par.@bellavita_org #Vaseline @Parle2020cookie #ChingsSecret #Harpic @mytridenthome #GoCheese#BiggBoss18 #BiggBoss… pic.twitter.com/urPIMWv9Ah
— Bigg Boss (@BiggBoss) December 2, 2024
तर दुसरीकडे आज शिल्पा शिरोडकरला तिच्या मित्रांकडून धोका मिळणार आहे. मागील आठवड्यामध्ये शिल्पा शिरोडकरने करणवीर मेहराच्या विरोधात येऊन इशा सिंहला टाइम गॉड बनवले आहे. तर आता कलर्सचया सोशल मीडियावर एक प्रोमो समोर आला आहे यामध्ये टाइम गॉड इशाला घरामधील तीन सदस्यांना वाचण्याची संधी मिळाली होती यामध्ये तीन तिचा मित्र अविनाश मिश्रा विवियन दिसेना आणि यामिनी मल्होत्रा यांना वाचवले आहे. तर शिल्पा शिरोडकरला तीन नॉमिनेट केले आहे.
या घटनेवरून आता करणवीर मेहरा शिल्पा शिरोडकरला म्हणाला की, शिक जरा इशाकडून तू तिला स्वतःची मुलगी बनवून ठेवलं आहेस. तुला काय वाटत आहे की इथे सगळे काय गाढव आली आहेत का? जागी हो कधी जगणार आहेस? ते लोक कोणत्याही पातळीवर त्यांच्या मित्रांना वाचवण्यासाठी जाऊ शकतात आणि तुला फेअर व्हायचं आहे १ सेकंदासाठी. आता आगामी भागामध्ये कशाप्रकारे नवी नाती पाहायला मिळणार आहे हे पाहणं मनोरंजक ठरेल.