(फोटो सौजन्य-Social Media)
सलमान खानचा रिॲलिटी शो बिग बॉस 18 सध्या खूप चर्चेत आहे. शोचा पहिला भाग या आठवड्यात रविवारी म्हणजेच ६ ऑक्टोबर रोजी लाँच होणार आहे. यावेळी कोणते स्पर्धक ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश करणार आहेत हे जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांनाच आहे. आत्तापर्यंत अनेक टीव्ही आणि बॉलिवूड स्टार्सना शो ऑफर करण्यात आले आहेत. याचदरम्यान, आता बातमी आली आहे की तारक मेहता का उल्टा चष्मा फेम दिशा वकानीला शोच्या निर्मात्यांनी ऑफर केली होती आणि ती देखील मोठ्या फीसह मात्र अभिनेत्रीने ही ऑफर नाकारली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बिग बॉस 18 च्या निर्मात्यांनी टीव्ही अभिनेत्री दिशा वकानीला हा शो ऑफर केला होता, मात्र, अभिनेत्रीने तो नाकारला. तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये दयाबेनची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीला 65 कोटी रुपयांपर्यंत फी देण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतल्याचे सांगितले जात आहे. मात्र, दिशाने एवढ्या मोठ्या रकमेकडे दुर्लक्ष केले आणि शोचा भाग होण्यास नकार दिला. दिशा जर 65 कोटी रुपये घेऊन शोमध्ये आली असती तर ती आतापर्यंतच्या सीझनमधील सर्वात महागडी स्पर्धक बनली असती. या सर्व माहितीला अभिनेत्री किंवा निर्मात्यांनी अद्याप दुजोरा दिलेला नाही.
हे देखील वाचा- राजपाल यादव, रवीना टंडन पोहचले गोविंदाला भेटायला रुग्णालयात, अभिनेत्याच्या तब्येतीची दिली माहिती!
आई झाल्यानंतर दिशा वकानीने लगेचच तारक मेहता का उल्टा चष्मा शो आणि टीव्ही इंडस्ट्रीचा निरोप घेतला. निया शर्मा बिग बॉस 18 ची पहिली कन्फर्म केलेली स्पर्धक ठरली आहे. तसेच, पंड्या स्टोअरची मालकीण फेम ॲलिस कौशिकला ही दुसरी पुष्टी झाल्याच्या बातम्याही चर्चेत होत आहे. आता रविवारी ६ ऑक्टोबरला कोणते कलाकार बिग बॉसच्या घरात येणार हे पाहणे उत्कंठाचे ठरणार आहे.