(फोटो सौजन्य-Social Media)
अभिनेता गोविंदाला मंगळवारी पहाटे 5 वाजता पायाला गोळी लागली. त्यानंतर अभिनेत्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. अभिनेत्याची मुलगी आणि मोठा भाऊ त्यांना येथे भेटायला आले होते. त्यांच्याशिवाय अनेक बॉलीवूड मधील त्याचे मित्र मंडळी अभिनेत्याची भेट घेण्यासाठी तिथे उपस्थित राहिले होते. आता अभिनेत्याची तब्येत बरी अजून, नुकतेच बॉलीवूड स्टार राजपाल यादव आणि रवीना टंडन यांनी अभिनेत्याला मुंबईच्या रुग्णालयात भेट दिली जिथे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तसेच राजपाल आणि रवीना या दोघांनीही चाहत्यांना गोविंदा लवकर बरा होईल असे आश्वासन दिले.
राजपाल यादव आणि रवीनाने घेतली गोविंदाची भेट
गोविंदाचा पार्टनर आणि भागम भाग को-स्टार राजपाल यादवने बुधवारी संध्याकाळी अभिनेत्याची भेट घेतली. बैठकीनंतर बाहेर पडताना राजपाल मीडियाशी बोलत होता. “ते बरे होत आहे. त्यांनी इतके चांगले कर्म केले आहेत की ते एका जीवघेणा घटने पासून वाचले आहेत. ते एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व आहे, आणि ते एक हिंदी चित्रपटसृष्टीच्या 100 वर्षांतील चित्रपटामधील 10 अभिनेत्यांपैकी एक आहेत. गोविंदा आता सुरक्षित आहे. आम्ही फक्त प्रार्थना करतो की ते लवकर बरे होतील आणि काम करतील. “गोविंदा भैया जिंदाबाद,” असे अभिनेता राजपाल यांनी सांगितले. गोविंदाला डिस्चार्ज कधी मिळणार असे विचारले असता, राजपालने मीडियाला डॉक्टरांच्या सल्ल्याने समाजेल. असे सांगितले.
तसेच अभिनेत्री रवीना टंडनने गोविंदाला भेट दिल्यानंतर ती म्हणाली की, “तो बरा दिसत आहे. तो बरा होत आहे. मी त्याला लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करते,” असे अभिनेत्रीने सांगितले. मंगळवारी चित्रपट निर्माते डेव्हिड धवन यांनीही गोविंदाची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. अभिनेता आणि दिग्दर्शकाने हिरो नंबर 1, कुली नंबर 1, राजा बाबू, पार्टनर आणि दीवाना मस्ताना यांसारख्या असंख्य चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे.
हे देखील वाचा- गोविंदाचे ‘हे’ सुपरहिट चित्रपट पहाच, हसून-हसून व्हाल वेडे
गोविंदाच्या आरोग्यबाबत अपडेट
गोविंदाला सामान्य वॉर्डमध्ये हलवण्यात आले आहे, त्याच्या कुटुंबीयांनी बुधवारी सांगितले की, तसेच अभिनेत्याचे उपचार पूर्ण झाल्यानंतर आता गोविंदा बारा आहे. गोविंदाची मुलगी टीना आहुजा पत्रकारांशी बोलताना अभिनेत्याच्या आरोग्यबाबत अपडेट शेअर करताना सांगितले की, गोविंदा यांना रुग्णालयातून लवकर डिस्चार्ज मिळण्याची शकता आहे. असे तिने सांगितले.