फोटो सौजन्य - सोशल मीडिया
बिग बॉस १८ : टेलिव्हिजनवरचा वादग्रस्त रिऍलिटी शो बिग बॉस १८ सध्या चर्चेचा विषय आहे. बिग बॉसच्या कालच्या भागामध्ये दाखवण्यात आले की, टाइम गॉडसाठी निवड झालेले सदस्य ईशा सिंह, एडिन रोस आणि विवियन डिसेना हे होते. या सदस्यांना बिग बॉसने बनवलेल्या जोड्या खांद्यावर घेऊन फिरायचे होते. यामध्ये इशा सिंह अविनाश मिश्रा यांच्या खांद्यावर होती तर एडिन रोस करणवीर मेहराच्या खांद्यावर होता. विवियन डिसेनाची जोडी रजत दलालसोबत बनवण्यात आली होती. यामध्ये रजत दलालने लगेचच विवियन डिसेनाला खाली उतरवले होते. आता सध्या स्पर्धा ईशा सिंह आणि एडिन रोस यांच्यामध्ये सुरु आहे. हा टास्क सुरु असताना एडिन रोस आणि रजत दलाल यांच्यामध्ये कडाक्याचा वाद पाहायला मिळाला.
प्रोमो व्हिडिओमध्ये एडिन रोज रजत दलालला म्हणत आहे की, ज्याला मी स्वतःचा समजत होतो तो खूप चेहरे बदलत आहे. तर प्रत्युत्तरात रजत दलाल म्हणाले की, जर एखाद्याची पहिली चॉईस कशिश असेल तर मी त्याला महत्त्व का देऊ? तेव्हा एडिनने उत्तर दिले – तू मला बाहेर बसून सांगितलेस की मी एडिनला सपोर्ट करत आहे. एडिनने रजत दलालचे नाव ‘पल्टू दलाल’ असे ठेवले आणि ती त्याला बिग बॉसच्या घरात पलटू दलाल म्हणत बराच वेळ चिडवत राहिली. एडिन म्हणाला- तू मला वाइल्ड कार्ड समजले आहेस. मी टाइम गॉड नाही झाले तर चालेल किंवा घराबाहेर झाली तरी चालेले पण तुझ्याकडून नाही व्हायचं आहे. 10 डोके असलेला साप जो विष टाकतो, एडिनने रजतला खडसावले.
बिग बॉस 18 संबंधित बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा
आता नवा प्रोमो या टास्कदरम्यानचा समोर आला आहे. यामध्ये आता करणवीर मेहरा आणि शिल्पा शिरोडकर यांच्यामध्ये पुन्हा वाद आणि दुरावा होणार आहे असे दिसून आले आहे. टास्कदरम्यान करणने शिल्पाला प्रश्न केला की, तुम्ही कोणाच्या बाजूने आहेत आणि तुम्हाला कोण वाटते की, घरचा नवा टाइम गॉड व्हायला हवा. यावर शिल्पाने सांगितले की, इशा मला आवडते जर ती झाली तर मला ती आवडेल.
प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये आता शिल्पा करणवर ओरडते आणि म्हणते की जर तू थांबलास तर मी माझा निर्णय बिग बॉसला देणार आहे. यावर पुन्हा शिल्पा करणवर ओरडते आणि म्हणते की जर तू थांबायचं नाही आहे, त्यानंतर ती लगेचच म्हणते की बिग बॉस मी माझा निर्णय देण्यासाठी तयार आहे. इशा आहे घराची नवी टाइम गॉड झाली आहे. यावर आता करण नाराज झालेला दिसत आहे. यावर दिग्विजय शिल्पाला म्हणतो की, अत्यंत खराब व्यक्ती आहेत तुम्ही… यावर आता करणवीर म्हणतो की, इशा तिची प्रायोरिटी आहे ना चालेल, त्यानंतर तो शिल्पाकडे जातो आणि प्रश्न करतो की, करण फक्त टाइम गॉड न बनण्यासाठी आहे का? आता याच्या मैत्रीमध्ये काय होणार हे पाहणं मनोरंजक ठरेल.
BIGG BOSS 18 PROMO#EishaSingh bani TIME GOD
Kya #ShilpaShirodkar ne #KaranveerMehra ko phir diya dhoka?? #BiggBoss18 #BiggBoss @BB24x7_ pic.twitter.com/nY47v20kNs
— BiggBoss24x7 (@BB24x7_) November 27, 2024