(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
सलमान खानचा लोकप्रिय शो बिग बॉस 18 रोजच चर्चेत असतो. शोच्या स्पर्धकांबाबत रोज वेगवेगळ्या बातम्या येत असतात. पण यावेळी बिग बॉस 18 च्या घरात असे काही घडले आहे, जे कदाचित सलमान खानलाही तो परत आल्यावर आवडणार नाही. वास्तविक, शोमधील दोन स्पर्धकांमध्ये जोरदार भांडण झाले आणि दोघांमध्ये जोरदार वाद होताना पाहायला मिळाले आहे. धक्काबुक्की सोबतच हाणामारीही दिसून आली. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. चला जाणून घेऊया कोण आहेत ते दोन स्पर्धक.
या दोन स्पर्धकांमध्ये झाले जोरदार भांडण
अलीकडेच, दिग्विजय राठीने बिग बॉस 18 मध्ये वाइल्ड एन्ट्री म्हणून घरात प्रवेश केला आहे. राठीला अविनाश मिश्रा अजिबात आवडत नसल्याचं सुरुवातीपासूनच दिसतंय आणि दोघांमध्ये खूप वादही पाहायला मिळत आहेत. पण ताज्या एपिसोडमध्ये या दोघांमधील तणावाचे वातावरण आणखीनच बिघडले आणि वादग्रस्त झाले आहे.
हे देखील वाचा- भगवान परशुरामच्या भूमिकेत लवकरच विक्की कौशल झळकणार, अभिनेत्याच्या हाती लागला ब्लॉकब्लस्टर चित्रपट!
Isliye Bolte Hai Par Nikalte Hi Jyada Fadfadao mat
It’s clearly Visible #DigvijaySinghRathee started Pushing Intentionally to #AvinashMishra now Mor Ban Ke Let Gya na 🌚
Finally Doggy Bana Mor 🦚
We Done Avinash 🔥
VDIANS STAND BY VIVIAN#BiggBoss18 pic.twitter.com/HPjMtJQgb5— 𝐀𝐚𝐫𝐚ꪜ (@itsmeAaravSK) November 12, 2024
वास्तविक, बिग बॉस सीझन 18 च्या लेटेस्ट एपिसोडचा प्रोमो व्हिडिओ टेली चक्करने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर शेअर केला आहे. ज्यामध्ये अविनाश आणि राठी एकमेकांशी भांडताना दिसत आहेत. पण प्रकरण इतके पुढे जाते की दोघेही एकमेकांना धक्काबुक्की करू लागतात आणि जोरदार हाणामारी करताना दिसले आहेत. मात्र, यादरम्यान अविनाशने दिग्विजयला जोरात धक्का दिला, त्यामुळे तो जमिनीवर पडला. आणि त्यानंतर दोघांमध्ये जोरदार भांडण झाले आहे.
हे देखील वाचा- ‘येक नंबर’मधील भूमिकेवरून अभिनेत्याचं मोठं वक्तव्य; राज ठाकरेंबाबत केलेली पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
सलमान खान घेणार या स्पर्धकांची शाळा
गेल्या काही वीकेंड का वार पासून सलमान खान बिग बॉस 18 होस्ट करत नाहीये. पण असे मानले जात आहे की तो येत्या शनिवारी शोमध्ये परत येऊ शकतो. असे झाले तर अविनाश मिश्रा आणि दिग्विजय राठी नक्कीच भाईजानच्या निशाण्यावर असतील. इतकंच नाही तर या वागणुकीसाठी सलमान त्यांच्यावर कठोर कारवाईही करू शकतात. आता सलमान खान येणाऱ्या एपिसोड मध्ये नक्की काय करणार हे पाहणे चाहत्यांसाठी उत्सुकतेचे झाले आहे.