फोटो सौजन्य - कलर्स सोशल मीडिया
बिग बॉस 18 : बिग बॉस 18 च्या वीकेंडच्या वारनंतर, सलमान खानच्या शोचा संपूर्ण खेळ बदलला आहे. एकीकडे तेजिंदर पाल सिंग बग्गाला शोमधून बाहेर फेकण्यात आले आहे. त्यानंतर आता आगामी भागामध्ये घरातले सदस्य एकमेकांना नॉमिनेट करताना दिसणार आहेत. घरातील प्रबळ स्पर्धकांची नावेही नामांकनांच्या यादीत समाविष्ट आहेत. अशा परिस्थितीत आता विवियन डिसेना फुल फॉर्ममध्ये दिसत आहे. जेव्हापासून विवियनची पत्नी नूरन शोमध्ये आली आणि त्याला त्याच्या टीममधील सदस्यांबद्दल सत्य सांगितले तेव्हापासून तो खूपच आश्चर्यचकित झाला आहे. त्याचवेळी आता विवियनने सर्वांवर प्रश्नांचा भडीमार सुरू केला आहे. शिल्पाने जे विचारले ते ऐकून विवियन अवाक झाला.
बिग बॉस 18 चा नवा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये विवियन डिसेना शिल्पा शिरोडकरला तिखट प्रश्न विचारताना दिसत आहे. तो शिल्पाला सांगतो, ‘सलमान सर म्हणाले, विवियन ट्रॅकवरून उतरतोय. तेव्हा माझा तुम्हाला एकच प्रश्न आहे, जर तुम्ही मला तुमचा समजत असाल तर तुम्ही मला कधीच का थांबवले नाही, मला कधीच का थांबवले नाही, कधी समजावले का नाही? जे मला या घरात सर्वात सुरक्षित वाटत आहे.
Bigg Boss 18: घराबाहेर पडताच तजिंदर बग्गा पोहचले हनुमान मंदिरात, पोस्ट करून चाहत्यांचे मानले आभार!
विवियनचे म्हणणे ऐकून शिल्पा म्हणाली, ‘मला कधीच वाटले नाही की तू ट्रॅकच्या बाहेर जात आहेस. तुम्ही आता जेवढे बोलत आहात तेवढे 50 दिवस बोलले नाही. यावर विवियन म्हणतो, ‘आज ती मेहराशी बोलते ना?’ यावर शिल्पा म्हणाली की हो मी बोलते. यावर विवियन म्हणतो, ‘मग तू मला का नाही सांगितलंस? माझ्यासोबत काय चाललंय? बिग बॉसने तुम्हाला विचारावे, सलमान सरांनी तुम्हाला विचारावे, तुम्ही तुमच्या शब्दांवर मागे जाऊ शकत नाही. जर तुम्ही तुमच्या शब्दांवर परत गेलात तर एकतर ते तुमचे पहिल्यांदा खोटे होते किंवा तुम्ही आता खोटे बोलत आहेत.
Jo the Vivian ke kareebi, ab wahi lagne lage hai unhe farebi. Kya hoga Vivian ka plan in the remaining journey?
Dekhiye #BiggBoss18 @ColorsTV aur #JioCinema par.#BB18 #BiggBoss18onJioCinema #BiggBoss @BeingSalmanKhan pic.twitter.com/mIN0gsp0Yr
— JioCinema (@JioCinema) December 16, 2024
बिग बॉस १८ च्या या अकराव्या आठवड्यामध्ये आठ सदस्य घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाले आहेत. यामध्ये करणवीर मेहरा, चुम दारंग, विवियन डिसेना, शिल्पा शिरोडकर, यामिनी मल्होत्रा, रजत दलाल, दिग्विजय राठी आणि श्रुतिका अर्जुन हे स्पर्धक या आठवड्यामध्ये घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाले आहेत. या आठवड्यामध्ये अविनाश मिश्रा घराचा टाइम गॉड आहे त्यामुळे त्याला या आठवड्यामध्ये विशेष नॉमिनेशनची पॉवर मिळणार आहे. आगामी भागामध्ये कशाप्रकारे सदस्य एकमेकांवर निशाणा साधणार हे पाहणं मनोरंजक ठरेल.