(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
‘बिग बॉस 18’ च्या घरातील आणखी एका स्पर्धकाचा प्रवास काल रात्री संपला. हा स्पर्धक दुसरा कोणी नसून भाजप नेते तजिंदर बग्गा आहे. तजिंदर बग्गा आणि विवियन डिसेना, करण वीर मेहरा, दिग्विजय राठी, चाहत पांडे आणि एडन रोज यांना निष्कासनासाठी नामांकन देण्यात आले होते. मात्र, मत न मिळाल्याने बग्गा यांना घरातून पडावे लागले. जर आपण त्याच्या प्रवासावर नजर टाकली तर त्यांनी सलमान खान होस्ट ‘बिग बॉस.च्या घरात 10 आठवडे घालवले आहेत. याचदरम्यान आता शोमधून बाहेर पडल्यानंतर बग्गा यांनी एक पोस्ट शेअर केली आहे आणि या ‘बिग बॉस’च्या घरातील अनोख्या प्रवासासाठी देवासह चाहत्यांचे आभार मानताना दिसत आहे.
तजिंदर बग्गा यांनी शेअर केली पोस्ट
तजिंदर बग्गा यांनी हनुमान मंदिरातील स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे आणि प्रवासाचा आढावा घेत कॅप्शनमध्ये लिहिले, ’70 दिवसांपूर्वी मी येथे डोके टेकवून प्रवास सुरू केला. दिल्लीला परत येताच मी इथे आलो आणि दर्शन घेतले. त्यांनी पुढे लिहिले की, ‘घराच्या आत, आम्ही (मी, श्रुतिका, ईशा, चुम, शिल्पा जी) हनुमान चालीसा आणि महामृत्युंजय मंत्राने दिवसाची सुरुवात करायचो, ज्यामुळे आम्हाला दररोज एक वेगळी शक्ती मिळाली.’ असे लिहून त्यांनी ही पोस्ट शेअर केली आहे.
चाहत्यांचेही आभार व्यक्त केले
तजिंदर बग्गा यांनी याचबरोबर चाहत्यांचे देखील आभार मानले आणि त्यांच्यासाठी कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘तुमच्या प्रेमाने मला बिग बॉसच्या घरात 10 आठवडे ठेवले, सर्वांचे खूप खूप आभार आणि धन्यवाद. जय बजरंग बली, जय महाकाल. बग्गाच्या एलिमिनेशननंतर आता शोमध्ये फक्त १४ स्पर्धक उरले आहेत. जे प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसत आहेत.
Bigg Boss 18 : या आठवड्यात 8 सदस्यांवर नॉमिनेशनची टांगती तलवार!
‘बिग बॉस 18’ चा फिनाले कधी होणार?
अविनाश मिश्रा, ईशा सिंग, विवियन डिसेना आणि श्रुतिका अर्जुन हे बग्गा यांच्या जाण्याने उदास दिसत होते कारण राजकीय नेता अनेकदा घरामध्ये या चार स्पर्धकांशी बोलताना दिसला होता. दहा आठवड्यांनंतर आता ‘बिग बॉस 18’ च्या घरात 14 लोक उरले आहेत. खेळ दिवसेंदिवस अधिक मनोरंजक होत आहे. रिपोर्ट्सनुसार, सलमान खान होस्ट करत असलेलया या शोचा फिनाले 19 जानेवारीला होणार आहे.