(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
बिग बॉस १९ मध्ये, स्पर्धक नवीन कॅप्टन बनण्यासाठी घरात स्पर्धकांमध्ये टास्क रंगणार आहे. या टास्कमध्ये शाहबाज, बसीर अली, प्रणीत मोरे आणि अभिषेक बजाज एकमेकांशी वाद घालताना दिसले आहेत. विशेषतः अभिषेक बजाजने शाहबाजवर जोरदार टीका केली आहे. ‘बिग बॉस’ ने नुकताच एक प्रोमो शेअर केला आहे ज्यामध्ये कॅप्टनसी टास्क पार पडला आहे.
Bigg Boss 19: अमाल मलिक आणि झीशान कादरीच्या मैत्रीत दरार? चोरी केलेल्या अंड्यांवरून सुरु झाला वाद
अभिषेकने शाहबाजवर केली टीका
बिग बॉस १९ च्या नवीन प्रोमोमध्ये, कॅप्टनसी टास्क दरम्यान, बिग बॉस म्हणतात, “डायनासोर लहान डायनासोरला खातो. जोपर्यंत तो सुरक्षित आहे तोपर्यंत तुमची कॅप्टन बनण्याची संधी अबाधित राहील.” सर्व स्पर्धक लहान डायनासोरला वाचवण्याचा प्रयत्न करतात. ते एकमेकांना टोमणे मारतानाही दिसतात. प्रोमोमध्ये अभिषेक बजाज शाहबाजला म्हणतो. “तुम्ही कॅप्टन होऊ शकत नाही कारण प्रत्येकाकडे एक पाळीव प्राणी असतो आणि तुमचा मालक देखील असतो.” हे ऐकून शाहबाजचा चेहरा पडताना दिसत आहे.
बसीर अली आणि प्रणीत मोरे मध्ये वाद
प्रोमोमध्ये पुढे बसीर अली आणि प्रणीत मोरे एकमेकांशी वाद घालताना दिसले आहेत. बसीर प्रणीतला म्हणतो की, “आम्ही तुला बाहेर काढू.” प्रणीत उत्तर देतो, “तुम्ही शक्य तितकी ताकद लावा. मी इथे आहे, तुम्ही पण इथेच आहात.” या प्रोमोमुळे आता चाहत्यांमधील उत्सुकता वाढली आहे. येणाऱ्या भागात आता लय होते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
मुनव्वर फारूकीला जिवेमारण्याची धमकी, कोण उठलंय कॉमेडियनच्या जीवावर? पोलिसांनी दिले अपडेट
कोणत्या स्पर्धकाला नामांकित करण्यात आले?
दर आठवड्याला, बिग बॉस १९ मधून एका स्पर्धकाला बाहेर काढले जाते. गेल्या आठवड्यात, आवेज दरबारला बाहेर काढण्यात आले. या आठवड्यात, नीलम गिरी, अशनूर कौर, तान्या मित्तल, अमाल मलिक, झीशान कादरी, कुनिका सदानंद, नेहल चुडासमा आणि प्रणीत मोरे यांना बाहेर काढण्यासाठी नामांकित करण्यात आले आहे. आता या आठवड्यात कोणता स्पर्धक घराबाहेर जातो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.