
(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित ड्रग्ज पार्ट्यांबाबतच्या चौकशीत बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि नोरा फतेही यांच्यासह अनेक बॉलिवूड स्टार्सची नावे समोर आली आहेत. मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाच्या ताब्यात असलेला अडीचशे कोटी रुपये एमडी ड्रग्ज प्रकरणातील आरोपी मोहम्मद सलीम सुहेल शेख याने बॉलिवूडचे दिग्गज कलाकार आणि राजकीय नेते यांच्यासाठी देश-विदेशात ड्रग्ज पार्ट्या आयोजित केल्याची माहिती चौकशीत दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या पार्टीतील नावांचा खुलासा झाला आहे. या बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर, तिचा भाऊ सिद्धांत कपूर, नोरा फतेही, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी आमदार झीशान सिद्दीकी, रॅपर लोका, चित्रपट निर्माते अब्बास मस्तान मॉडेल अलीशा पारकर (दाऊद इब्राहिमची बहीण हसिना पारकरचा मुलगा) आणि सोशल मीडिया व्यक्तिमत्व ओरी उर्फ ओरहान यांचा नावाचा उल्लेख आहे.
ताहिर डोलाने दावा केला की, या सर्व व्यक्तींसोबत त्याने देशात आणि देशाबाहेर ड्रग्ज पार्ट्या आयोजित केल्या आणि त्यामध्ये ड्रग्ज पुरवले. ज्या व्यक्तींची नावे समोर आली आहेत त्यांचे इतर ड्रग्ज तस्करांशी काही संबंध आहेत का याचीही तपासणी या तपासात केली जाणार आहे.
चौकशीदरम्यान ताहिर डोलाने सांगितले की, हे सर्व लोक केवळ मुंबई आणि गोव्यात आयोजित केलेल्या ड्रग्ज पार्ट्यांमध्ये आले होते असं नाही, तर दुबई आणि थायलंडमध्येही पार्ट्यामध्ये ते आले होते. दरम्यान मुंबई पोलिसांनी 16 फेब्रुवारी 2024 रोजी कुर्लामधून परवीन बानो गुलाम शेख या महिलेला 25 कोटी रुपयांच्या मेफेड्रॉनसह अटक केली होती. तपासामध्ये विक्रेत्यांपासून उत्पादकांपर्यंत मोठी साखळीचा पदार्फाश केला असून या प्रकरणात पोलिसांनी जवळपास 15 जणांना अटक केली.
Dharmendra यांच्या प्रकृतीत सुधार; हेमा मालिनी पतीच्या ९० व्या वाढदिवसाच्या तयारीत व्यस्त
अभिनेत्री नोरा फतेहीने एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये तिचा राग व्यक्त केला. अभिनेत्रीने लिहिले की, “मी पार्ट्यांमध्ये जात नाही. मी सतत काम करत असते. मी वर्कहोलिक आहे. माझे वैयक्तिक आयुष्य नाही. मी अशा लोकांशी स्वतःला जोडत नाही. जेव्हा मी सुट्टीवर असते तेव्हा मला दुबईतील माझ्या घरी आणि समुद्रकिनाऱ्यावर माझ्या मित्रांसोबत वेळ घालवायला आवडते. मी रात्रंदिवस काम करत असते.”
(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)
नोराने पुढे लिहिले, “तुम्ही जे काही वाचता त्यावर विश्वास ठेवू नका. मला हळूहळू टार्गेट केले जात आहे. पण मी यावेळी असे होऊ देणार नाही. हे आधीही घडले आहे. तुम्ही लोकांनी मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला, खोटे बोललात, पण काहीही काम झाले नाही. ज्या गोष्टींशी माझा काहीही संबंध नाही अशा गोष्टींपासून माझे नाव आणि फोटो दूर ठेवा. हे महागात पडू शकते.”
‘Fauzi’ आता एक नाही, दोन भागात प्रेक्षकांच्या भेटीला, प्रभासच्या चित्रपटाची नवीन अपडेट