अमली पदार्थ प्रतिबंधक पथकास माहिती मिळाली की, सिल्कमिल कॉलनीतील हमालवाडा रोडवरील रेल्वेस्टेशन वालकंपाउंड भिंतीलगत शेख मिनाज हा त्याच्या साथीदारासह एमडी पावडरची विक्री करत आहे.
येणाऱ्या ३१ डिसेंबर तसेच सध्याच्या पर्यटन हंगामाबाबत पोलिसांसह सर्व यंत्रणानी सतर्क राहून भरीव कारवाई करावी, असे निर्देश रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिले.
Drug Smuggling Case: अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात अमली पदार्थ प्रतिबंध शाखेने मोठी कारवाई केली आहे. नगर रोड न परिसरात नशेच्या गोळ्यांची विक्री करत असताना एका महिलेसह दोन तरुणांना रंगेहात पकडण्यात आले.
Mumbai News: मुंबई पोलिसांनी जानेवारी ते ऑक्टोबर २०२५ या १० महिन्यांत विशेष कारवाई करून तब्बल ₹६७९.२४ कोटी रुपयांचे अंमली पदार्थ (ड्रग्ज) जप्त केले. याप्रकरणी ९७१ गुन्हे दाखल करत १,१९५ तस्करांना…
Bollywood Celebrity Drug Party: २५२ कोटी रुपयांच्या मेफेड्रोन ड्रग्ज तस्करी प्रकरणी अभिनेत्री श्रद्धा कपूरचा भाऊ सिद्धांत याची एनसीबीकडून चौकशी करण्यात आली आहे.
सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर ओरी यांना मुंबई पोलिसांनी समन्स बजावले आहेत. २५२ कोटी रुपयांच्या ड्रग्ज प्रकरणासंदर्भात अमली पदार्थ विरोधी कक्षाने २० नोव्हेंबर २०२५ रोजी चौकशीसाठी बोलावले आहे.
Bollywood Celebrity Drug Party: ड्रग्ज पार्ट्यांबाबतच्या चौकशीत बॉलिवूड कलाकार आणि राजकीय नेते यांची नावे समोर आली असून या संदर्भात अभिनेत्री नोरा फतेहीने इंस्टाग्राम पोस्टमध्ये तिचा राग व्यक्त केला आहे
ड्रग्ज चरस, गांजा पेक्षाही अधिक प्रभावी असल्याचे सांगण्यात येत आहे. अनेक दिवसानंतर मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ जप्त करण्यात आल्याने या ड्रग्जच्या तस्करीची आंतराष्ट्रीय साखळी शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे.
पुण्यातील खराडी येथे कथित रेव्ह पार्टी प्रकरणात एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणात त्यांनी ड्रग्सचे सेवन केले नसल्याचे समोर आले आहे.
Crime News: खराडी येथे कथित रेव्ह पार्टी प्रकरणात प्रांजल खेवलकर यांच्यासह 6 जणांना अटक करण्यात आली होती. दरम्यान त्यांना पुणे कोर्टाने जामीन मंजूर केला आहे.
गांजा विक्री करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन अट्टल गुन्हेगारांना वानवडी पोलिसांच्या पथकाने सापळा रचून जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून पावणे दोन किलो गांजा जप्त करण्यात आला आहे.
नाईट लाईफ, पब व हायप्रोफाईल पार्ट्यांवर पुणे पोलिसांकडून जोरदार कारवाई सुरू आहे. गेल्या चार वर्षात पुणे पोलिसांनी पुण्यात ड्रग्जचा पुरवठा करणाऱ्या तब्बल ७०५ पेडलरांना दणका देत त्यांना जेरबंद केले आहे.
Crime News: पुण्यातील रेव्ह पार्टीत खडसेंच्या जावयाला अटक करण्यात आल्याने राज्यातील वातावरण तापले होते. महाजन आणि खडसे यांच्यात आरोप-प्रत्यारोप झालेले पाहायला मिळाले होते.
संकेतचे वडील अजय बुग्गेवार हे भारतीय जनता पक्षाचे सक्रीय कार्यकर्ता आहेत. पूर्वी ते प्रभाग 30 चे नगरसेवक होते. संकेतला बॉडी बिल्डिंगची आवड आहे. दिवसरात्र तो जिममध्ये व्यायाम करतो. वाईट संगतीमुळे…