(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
भारताचे आघाडीचे जाहिरात निर्माते आणि अॅडगुरू म्हणून ओळखले जाणारे प्रह्लाद कक्कर यांनी प्रियंका चोप्राच्या आयुष्यातील एक धक्कादायक खुलासा केला आहे. एका मुलाखतीत प्रियंका चोप्रा हीच्या खास नात्यांवर सूचक विधान केलं आहे. त्यांनी थेट नाव न घेता म्हटलं की, ”बॉलिवूडमध्ये एक काळ असा होता जेव्हा प्रियंकाचं नाव एका सुपरस्टारसोबत सातत्याने जोडलं जात होतं.”
‘तो भिंतीवर डोके आपटायचा’, ऐश्वर्याच्या प्रेमात वेडा होता सलमान? प्रल्हाद कक्कर यांचा शॉकिंग खुलासा
काय म्हणाले प्रह्लाद कक्कर?
प्रह्लाद कक्कर यांनी विक्की लालवानी यांना दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्री प्रियंका चोप्रा बद्दल काही खास गोष्टी शेअर केल्या आहेत. त्यांनी सांगितलं की, “प्रियंका ही खूपच टॅलेंटेड, फोकस्ड आणि सिंगल-माइंडेड अभिनेत्री आहे. तिच्यासोबत काम करण्याचा अनुभव खूपच छान होता.”
कक्कर पुढे म्हणाले की, ती कधीच आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल उघडपणे किंवा बेधडक बोलत नाही. एक काळ असा होता की, तिच्या एका सुपरस्टारसोबतच्या अफेअरच्या खूप चर्चा होत्या, मात्र प्रियंकाने यावर कधीच प्रतिक्रिया दिली नाही. तिला हे मुळीच नको होतं की, तिच्या वैयक्तिक आयुष्यावर चर्चा करावी.
६० कोटी बजेट, १२५ दिवसांचे शूटिंग; ‘मिराई’ने पाच दिवसांत ३ ब्लॉकबस्टर चित्रपटांचा विक्रम मोडला
यावेळी त्यांनी असंही सांगितले की, त्या काळात प्रियंकाला तिच्या रंगामुळे अनेकदा टोमणे ऐकावे लागले, पण तिने कधीच हार मानली नाही. ती लांब उंचीची मुलगी असून, ‘दोस्ताना’ चित्रपटात जॉन अब्राहम आणि अभिषेक बच्चन यांच्यासोबत काम करण्यासाठी तिने खूप मेहनत घेतली.
ती कधीही रिस्क घेण्यापासून घाबरत नाही. कक्कर यांनी म्हटले की प्रियंका चोप्राच्या व्यक्तिमत्त्वात एक विशेष साहस आहे, हेच कारण आहे की बॉलिवूडनंतर तिने हॉलीवूडमध्येही धाडसाने पाऊल टाकलं आणि तिथेही आपल्या मेहनतीच्या जोरावर नाव कमावलं आहे.