(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
मिराई चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालताना दिसत आहे. रिलीज होण्याआधीच मिराई हा चित्रपट प्रेक्षकांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चेचा विषय ठरला होता. १२ सप्टेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाने अवघ्या ५ दिवसात प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. त्याने पाचव्या दिवशी ही जोरदार कमाई केली आहे. तेजा सज्जाच्या फॅन्टसी अॅडव्हेंचर चित्रपटाने पाचव्या दिवशी ६ कोटींची कमाई केली. तर देशांतर्गत एकूण ५६.७५ कोटींची कमाई केल्याची अकडेवारी समोर आली आहे.
सॅकनिल्कच्या मते, मंगळवारीच्या कलेक्शननंतर चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ५६.७५ कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे. पहिल्या दिवशी मिराईने १३ कोटी रुपये, त्यानंतर शनिवारी १५ कोटी रुपये आणि रविवारी १६.६ कोटी रुपये कमावले आहेत. तर वीकेंड संपल्यानंतर, आकड्यांमध्ये घट झाली, सोमवारी चित्रपटाने ६.४ कोटी रुपये आणि मंगळवारी ५.७५ कोटी रुपये कमावले आहेत.
‘तो भिंतीवर डोके आपटायचा’, ऐश्वर्याच्या प्रेमात वेडा होता सलमान? प्रल्हाद कक्कर यांचा शॉकिंग खुलासा
मराई चित्रपटाचे बजेट अंदाजे 60 कोटींचे आहे. ज्यामध्ये भव्य VFX पाहायला मिळत आहे. या चित्रपटाचे शूटिंग अवघ्या १२५ दिवसांत पूर्ण झाले आहे. हा चित्रपट तेलुगू चित्रपटांमधील सर्वात महागडा आणि पौराणिक कथांवरील चित्रपटांपैकी एक मानला जातो.मराई चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. प्रेक्षकांनी चित्रपटाची दृश्ये, पौराणिक ट्विस्ट, आणिअॅक्शनचे कौतुक केले आहे.
‘मिराई’ चित्रपटाबद्दल थोडक्यात माहिती
‘मिराई’ हा चित्रपट ‘वेधा’ नावाच्या एका तरुणाची कथा सांगणारा चित्रपट आहे. या चित्रपटात वेधा नावाची भूमिका अभिनता तेजा सज्जा यांनी साकारली आहे. चित्रपट कथा अॅक्शन, आणि थोडासा भावनांनी भरलेला आहे. कार्तिक गट्टमनेनी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. प्रदर्शनाच्या फक्त दोन दिवसांतच ‘मिराई’ ने जगभरात ५५ कोटींहून अधिक कमाई केली होती. तर देशांतर्गत एकूण ५६.७५ कोटींची कमाई केल्याची अकडेवारी समोर आली आहे.