(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
रजनीकांतचा ‘कुली’ आणि हृतिक रोशनचा ‘वॉर २’ हा चित्रपट १२ व्या दिवशीही चित्रपटगृहात एकमेकांना जोरदार टक्कर देत आहे. वीकेंडनंतर दोन्ही चित्रपटांच्या कमाईत घट होत असली तरी, त्यानंतरही या चित्रपटांनी या वर्षी प्रदर्शित झालेल्या मोठ्या चित्रपटांना मागे टाकले आहे. आता, १२ व्या दिवशीही ‘कुली’ आणि ‘वॉर २’ च्या कमाईत घट झाली आहे. चला तर मग जाणून घेऊयात दोन्ही चित्रपटांनी आतापर्यंत किती कमाई केली आहे?
‘कुली’ ची चित्रपटाची आतापर्यंतची कमाई?
सॅकनिल्कच्या अहवालानुसार, रजनीकांत यांच्या ‘कुली’ या अॅक्शन चित्रपटाने १२ व्या दिवशी भारतात ३ कोटींचा व्यवसाय केला आहे. त्याची तमिळ ऑक्युपन्सी १३.६७% होती. सकाळचे शो १२.२९%, दुपारचे शो १३.४८%, संध्याकाळचे शो १४.९७% आणि रात्रीचे शो १३.९३% होते. चित्रपटाने आतापर्यंत भारतात २६०.३५ कोटींचा व्यवसाय केला आहे. जगभरातील कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर, कुलीने आतापर्यंत तब्बल ४७९ कोटींची कमाई केली आहे.
‘वॉर २’ ची आतापर्यंतची कमाई?
दुसरीकडे, हृतिक रोशनच्या ‘वॉर २’ ने १२ व्या दिवशी बॉक्स ऑफिसवर २.२५ कोटींचा व्यवसाय केला. त्याची हिंदी ऑक्युपन्सी ८.०१% होती. शोबद्दल बोलायचे झाले तर, सकाळचे शो ५.८४%, दुपारचे शो ८.२६%, संध्याकाळचे शो ८.७०% आणि रात्रीचे शो ९.२४% होते. चित्रपटाने आतापर्यंत भारतात २२४.२५ कोटींची कमाई केली आहे. हृतिकच्या ॲक्शन चित्रपटाने जगभरातील कलेक्शनमध्ये ३४०.१५ कोटी रुपयांचा टप्पा गाठला आहे.
Reginald Carroll: अमेरिकन स्टँड-अप कॉमेडियनची गोळी घालून हत्या, ‘या’ प्रकरणात एका संशयिताला अटक
‘वॉर २’ ‘कुली’ पेक्षा किती आहे मागे?
रजनीकांतचा ‘कुली’ या वर्षीचा सर्वाधिक कमाई करणारा तिसरा चित्रपट ठरला आहे. तसेच, हा चित्रपट अजूनही अहान पांडेच्या ‘सैयारा’ आणि विकी कौशलच्या ‘छावा’ च्या मागे आहे. दुसरीकडे, हृतिक रोशनचा ‘वॉर २’ हा चित्रपट या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. तो रजनीकांतच्या चित्रपटापेक्षा १३८.८५ कोटींनी मागे आहे. यासोबतच, थिएटरमधील प्रेक्षक ‘वॉर २’ पेक्षा ‘कुली’ जास्त पाहणार आहेत आणि रजनीकांतच्या अॅक्शनचे खूप कौतुक करत आहेत.