रॉकस्टार डीएसपी म्हणून प्रसिद्ध असलेले राष्ट्रीय पुरस्कार विजेते संगीतकार देवी श्री प्रसाद यांनी सातत्याने भारतीय चित्रपटसृष्टीतील काही अविस्मरणीय ट्यून दिले आहेत. ‘वर्षम’ च्या सदाबहार गाण्यांपासून ते ‘पुष्पा 2: द रुल’च्या बहुप्रतीक्षित गाण्यांपर्यंत, डीएसपीच्या गाण्याची चर्चा जगभरात सुरु आहे. केवळ गाण्यांनी नाही तर त्याच्या प्रतिभेने त्याला मोठा चाहता वर्ग आणि असंख्य प्रशंसा मिळवून दिली आहे, ज्यामुळे तो देशभरातील चित्रपट निर्मात्यांसाठी सर्वोच्च निवड बनला आहे.
2024 हे वर्ष डीएसपीच्या संगीतासाठी खास ठरतं ‘पुष्पा 2: द रुल’ असो, सुरियाचा ‘कंगुवा’ असो किंवा पवन कल्याणचा ‘उस्ताद भगतसिंग’ असो, DSP चा 2024 लाइनअप हे त्याच्या विलक्षण अष्टपैलुत्वाचे खरे प्रदर्शन आहे आणि तो इंडस्ट्रीमध्ये कसा सगळ्यांचा आवडता आहे हे दाखवून दिले आहे. याशिवाय, डीएसपी अजितच्या ‘गुड बॅड अग्ली’, नागा चैतन्यच्या ‘थंडेल’, धनुषच्या ‘कुबेरा’ आणि राम चरणच्या अद्याप शीर्षक नसलेल्या प्रकल्पासाठी त्याचे संगीत देणार आहे. जे ऐकण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत.
डीएसपीने संगीताच्या सीमांना पुढे ढकले आणि प्रत्येक प्रकल्पात नावीन्य आणणे सुरू ठेवण्याचे काम पूर्ण केल्यामुळे चाहत्यांचा तो आणखी पसंतीस आला आहे. आताच्या पिढीला त्याची सगळी गाणी आवडत असून, त्यावर थिरकू लागले आहेत. डीएसपीच्या नवनवीन गाण्याची प्रेक्षक वाट पाहत त्याच्या संगीताचे साक्षीदार होण्यासाठी ते आतुर झाले आहेत. संगीतकार भारतीय संगीत उद्योगात आपला दबदबा कायम ठेवण्यासाठी आणि आपल्या उल्लेखनीय रचनांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करत राहण्यासाठी सज्ज झाला आहे.
रॉकस्टार डीएसपीच्या आज वाढदिवसानिमित्त त्याचे चाहते त्याला सोशल मीडियावर शुभेच्छाचा वर्षाव करताना दिसत आहेत. याचदरम्यान चाहत्यांनी त्याच्या प्रत्येक गाण्यावर भरभरून प्रेम केले आहे. तसेच नुकताच रिलीज झाला ‘कांगुवा’ या चित्रपटातील पहिल ‘फायर’ गाणं आउट झाले आहे. या गाण्याला देखील संगीतकार रॉकस्टार डीएसपी आणि बी प्राक या दोघांच्या आवाज लाभला आहे. हे गाणं सर्वत्र गाजत आहे. या गाण्यावरून हे सिद्ध होते की जेव्हा दोन संगीतकार एकत्र येतात तेव्हा कोणतेही गाणं हे नक्कीच व्हायरल होते. दिग्गज संगीतकार देवी श्री प्रसाद उर्फ रॉकस्टार डीएसपी आणि बी प्राक या दोघांचे “फायर” गाणं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.