Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 24 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

TOXIC Teaser Out: यशचा खतरनाक अवतार; ‘राया’च्या दमदार अ‍ॅक्शनसमोर KGF ही मागे, टीझरने वेधले लक्ष

यशच्या "टॉक्सिक" चित्रपटाचा धमाकेदार टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. चाहते ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण अखेर आला आहे. होळीपूर्वी यशने चाहत्यांना एक मोठे सरप्राईज देऊन त्यांना खुश केले आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Feb 20, 2026 | 10:50 AM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • “टॉक्सिक” चित्रपटाचा धमाकेदार टीझर रिलीज
  • राया’च्या दमदार अ‍ॅक्शनसमोर KGF ही मागे
  • टीझर पाहून चाहतेही चकीत
 

यश, कियारा अडवाणी आणि मोठ्या स्टारकास्ट अभिनीत “टॉक्सिक” हा चित्रपट त्याच्या शक्तिशाली शीर्षक परिचय व्हिडिओपासूनच चर्चेत आहे. टीझर प्रदर्शित झाला आहे आणि चाहते चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. दिग्दर्शक गीतू मोहनदास यांनी २० फेब्रुवारी रोजी टीझर प्रदर्शित होण्याची घोषणा आधीच केली होती आणि तेव्हापासून चाहते उत्सुकतेने भरलेले आहेत. या टीझरमुळे चित्रपटासाठी उत्सुकता निर्माण झाली आहे. हा चित्रपट रणवीर सिंगच्या “धुरंधर २” हा सिनेमागृहात टक्कर देणार आहेत.

गीतू मोहनदास यांनी तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर यशचा पोस्टर शेअर करून टीझरच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. कॅप्शनमध्ये अभिनेत्याने लिहिले की, “सकाळी ९:३५ | २०.०२.२०२६ टॉक्सिक टीझर होणार प्रदर्शित, टॉक्सिक येत्या १९-०३-२०२६ पासून जगभरातील सिनेमागृहात पाहण्यासाठी व्हा सज्ज.” चाहत्यांनी फायर इमोजीसह प्रतिक्रिया दिल्या आणि या अपडेटची आतुरतेने वाट पाहत होते. १२३ तेलुगु नुसार, टॉक्सिकचा ट्रेलर सिनेमागृहात मार्चच्या पहिल्या आठवड्यात प्रदर्शित होण्याची शक्यता असल्याचे समोर आलेले आहे. परंतु याची अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नाही.

काय आहे “टॉक्सिक” ची कथा?

आता, चित्रपटाचे यूएई वितरक, फार्स फिल्म्सने त्यांच्या वेबसाइटवर चित्रपटाबद्दल काही तपशील शेअर केले आहेत, ज्यामध्ये चित्रपटाची कथा उघड झाली आहे. त्यात म्हटले आहे की “टॉक्सिक” हे १९४० आणि १९७० च्या दशकात गोवा शहरावर केंद्रित आहे. यशचे पात्र, राया, भीती, शक्ती आणि साम्राज्य निर्माण करण्याच्या इच्छेने प्रेरित आहे. पुढे लिहिले आहे की, “प्रत्येक कृतीचा एक परिणाम असतो. ताकद कोणी देत नाही, ती हिसकावून घ्यावी लागते आणि त्यासाठी नेहमीच एक किंमत मोजावी लागते. जसजसे तस्करीचे मार्ग युद्धभूमीत रूपांतरित होतात, तसतशी निष्ठा संशयात बदलते आणि भीतीचे सावटच जगण्याचा आधार बनते. अखेरीस, त्याचे निर्णयच त्या परिणामांपेक्षा अधिक शक्तिशाली ठरतात.”

Kerala Story 2 च्या प्रमाणपत्रावर उच्च न्यायालयाची नोटीस; निर्माते आणि सेन्सॉर बोर्डला सुनावणी, संवाद-कंटेंटवरून वाढला वाद

‘टॉक्सिक’ चित्रपट ‘धुरंधर २’ला देणार टक्कर

यशच्या आगामी ‘टॉक्सिक: अ फेयरीटेल फॉर ग्रोनअप्स’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबतच्या अटकळाला पूर्णविराम देण्यात आला आहे. वृत्तानुसार, हा चित्रपट नियोजित वेळेनुसार १९ मार्च २०२६ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होईल. या प्रदर्शन तारखेमुळे चित्रपटाची थेट स्पर्धा ‘धुरंधर २’शी होईल, ज्यामुळे बॉक्स ऑफिसवर मोठी लढाई होण्याची शक्यता आहे. हॉलिवूड रिपोर्टर इंडियाच्या वृत्तानुसार, २०२५ च्या हिट चित्रपट ‘धुरंधर’च्या सिक्वेलशी स्पर्धा असूनही ‘टॉक्सिक’च्या निर्मात्यांनी चित्रपट पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला नाही.

 

टॉक्सिकचे बजेट आणि कलाकारांची माहिती

‘टॉक्सिक’ हा एक पीरियड ॲक्शन थ्रिलर आहे जो गीतू मोहनदास यांनी लिहिलेला आणि दिग्दर्शित केला आहे. यश व्यतिरिक्त, या चित्रपटात कियारा अडवाणी, नयनतारा, हुमा कुरेशी, तारा सुतारिया आणि रुक्मिणी वसंत यांच्या भूमिका आहेत. अक्षय ओबेरॉय, सुदेव नायर, अमित तिवारी आणि इतर अनेक कलाकार देखील या चित्रपटाचा भाग आहेत. बजेटबद्दल बोलायचे झाले तर, “टॉक्सिक” चित्रपटाचे अंदाजे बजेट ₹६०० कोटी असण्याची शक्यता आहे. याचा अर्थ बॉक्स ऑफिसवर कमाई करण्यासाठी त्याला कठोर परिश्रम करावे लागतील.

शिवजयंतीनिमित्त डोंबिवलीत ‘स्वराज्य’ संकल्पनेला मिळाली उभारी; छत्रपतींच्या इतिहासाला साजेसं भव्य शीर्षक गीत रिलीज

“टॉक्सिक” हा चित्रपट सहा भाषांमध्ये होणार प्रदर्शित

हा चित्रपट कन्नड आणि इंग्रजीमध्ये एकाच वेळी चित्रित करण्यात आला आहे आणि हिंदी, मल्याळम, तेलगू आणि तमिळसह सहा भारतीय भाषांमध्ये डब करून प्रदर्शित केला जाणार आहे. यश शेवटचा ‘KGF: Chapter 2’ मध्ये मुख्य भूमिकेत दिसला होता. प्रशांत नील दिग्दर्शित या अ‍ॅक्शन चित्रपटाला थिएटरमध्ये प्रचंड यश मिळाले आणि त्याने जगभरात ₹१,२१५ कोटींची कमाई केली आहे. जवळजवळ चार वर्षांनंतर, अभिनेता ‘टॉक्सिक’ चित्रपटातून मोठ्या पडद्यावर परतत आहे. तो रणबीर कपूरच्या आगामी ‘रामायण’ मध्येही रावणाची भूमिकाही साकारणार आहे, हा चित्रपट येत्या दिवाळीत प्रदर्शित होणार आहे.

 

Web Title: Toxic teaser yash kiara advani nayanthara huma qureshi rukmini vasanth film

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 20, 2026 | 10:50 AM

Topics:  

  • entertainment
  • Tollywood Actor
  • tollywood movie

संबंधित बातम्या

Bandla Ganesh Daughter Wedding: लेकीची पाठवणी अन् प्रसिद्ध अभिनेत्याला अश्रू अनावर! मुलीचा हात उराशी धरलेला भावूक VIDEO चर्चेत
1

Bandla Ganesh Daughter Wedding: लेकीची पाठवणी अन् प्रसिद्ध अभिनेत्याला अश्रू अनावर! मुलीचा हात उराशी धरलेला भावूक VIDEO चर्चेत

AR Rahman Tamil Idol Auditions : गायक बनण्याची सुवर्णसंधी! ए. आर. रहमान शोधणार नवा तमिळ आवाज; ‘सोनी लिव’वर ऑनलाइन ऑडिशन्स सुरू
2

AR Rahman Tamil Idol Auditions : गायक बनण्याची सुवर्णसंधी! ए. आर. रहमान शोधणार नवा तमिळ आवाज; ‘सोनी लिव’वर ऑनलाइन ऑडिशन्स सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.