(फोटो सौजय -इन्स्टाग्राम)
तामिळनाडूचे दिवंगत मुख्यमंत्री एम. करुणानिधी यांचे ज्येष्ठ पुत्र आणि अभिनेते आणि गायक एम.के. मुथू यांचे आज वयाशी संबंधित काही आजारांमुळे निधन झाले. ७७ वर्षीय एम.के. मुथू हे राज्याचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांचे मोठे भाऊ होते. एम.के. मुथू यांच्या निधनाची माहिती कुटुंबाने दिली आहे. एम.के. मुथू हे तमिळ चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व होते. तसेच त्यांच्या मृत्यूने आता इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली आहे.
आज संध्याकाळी होणार अंत्यसंस्कार
अभिनेते एका राजकीय कुटुंबातून असल्याने, राज्य सरकारने एमके मुथू यांच्या निधनाची माहिती दिली आणि सांगितले की त्यांचे पार्थिव गोपालपुरम येथील अभिनेत्याच्या निवासस्थानी लोकांना अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. मिळालेल्या माहितीनुसार, एमके मुथू यांचे अंत्यसंस्कार आज संध्याकाळी केले जातील. त्यांच्या या बातमीने सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे.
सीएम एमके स्टॅलिन यांनी भावाच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला
मोठ्या भावाच्या निधनाबद्दल एमके स्टॅलिन म्हणाले की, कलैग्नार (करुणानिधी) कुटुंबातील ज्येष्ठ पुत्र, माझा प्रिय भाऊ एमके मुथू यांच्या निधनाची बातमी आज सकाळी माझ्यासाठी खूप मोठा धक्का ठरली. माझी काळजी घेणाऱ्या आणि पालकांसारखे प्रेम करणाऱ्या माझ्या प्रिय भावाचे जाणे माझ्यासाठी खूप दुःख आणि धक्का आहे. सीएम स्टॅलिन आणि त्यांचे पुत्र आणि राज्याचे उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांच्यासह राजकीय जगतातील अनेक लोक एमके मुथू यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पोहोचत आहेत.’
‘King’ च्या सेटवर अभिनेता शाहरुख खान जखमी? थांबले शूटिंग, चित्रपटाच्या सदस्याने सांगितले सत्य
१९७० च्या दशकात अभिनय क्षेत्रात पदार्पण
एमके मुथू यांनी १९७० च्या दशकात अभिनय क्षेत्रात प्रवेश केला. त्यांच्या पहिल्याच चित्रपटात त्यांनी दुहेरी भूमिका साकारली. त्यांनी ‘पिल्लईयो पिल्लई’, ‘पुक्करी’, ‘समयालकरण’ आणि ‘अनाया विलाक्कू’ सारख्या अनेक संस्मरणीय चित्रपटांमध्ये काम केले. एमके मुथू एक अभिनेते आणि गायकही होते. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक संस्मरणीय गाणी गायली आहेत, जी अजूनही लोकांच्या ओठांवर आहेत. त्यानी केलेले काम आणि त्याचे श्रेय लोकांच्या नेहमीच लक्षात राहणार आहे.