(फोटो सौजय -इन्स्टाग्राम)
दरवर्षी कोणीतरी स्टार किड बॉलीवूडमध्ये पदार्पण करताना नेहमीच दिसत असतो. या वर्षी २०२५ मध्ये अहान पांडेने ‘सैयारा’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अनित पद्डा दिसणार आहे. हा तिचा मुख्य अभिनेत्री म्हणून पहिला चित्रपट आहे. मोहित सुरी दिग्दर्शित ‘सैयारा’ या संगीतमय प्रेमकथेतील चित्रपटाने पहिल्या दिवशी दुहेरी आकड्यांसह २० कोटींची कमाई केली आहे. इतकेच नाही तर त्याने पदार्पणातील चित्रपटांचा सर्वकालीन विक्रम मोडला आहे. ‘सैयारा’ चित्रपटातील मुख्य कलाकार अहान पांडे आणि अनिता पद्डा कोण आहेत हे जाणून घेणार आहोत.
बॉलीवूडचा नवा अभिनेता अहान पांडे कोण आहे?
अहान पांडे बॉलीवूडमधील एका प्रसिद्ध कुटुंबातील आहे. तो चंकी पांडेचा भाऊ चिक्की पांडेचा मुलगा आणि अलाना पांडेचा धाकटा भाऊ आहे. याशिवाय, तो अभिनेत्री अनन्या पांडेचा चुलत भाऊ आहे. अहानची आई डीन पांडे एक प्रसिद्ध आरोग्य तज्ञ आणि लेखिका आहे. अहान पांडेनेही त्याच्या काका आणि बहिणीच्या पावलावर पाऊल ठेवून बॉलीवूडमध्ये करिअर करण्यासाठी निघाला आहे.
मनोरंजक गोष्ट म्हणजे त्याचा पहिला चित्रपट सुपर-डुपर हिट ठरला आहे, त्यानंतर लोकांच्या त्याच्याकडून अपेक्षा खूप वाढल्या आहेत. मुंबई विद्यापीठातून पदवी घेतल्यानंतर अहान पांडेने कला, चित्रपट आणि टीव्ही निर्मितीमध्ये विशेष प्राविण्य मिळवले आहे. आणि आता अभिनेता पहिल्याच चित्रपटानंतर लोकांची प्रशंसा मिळवत आहे.
अहान पांडेची अभिनेत्री अनित पद्डा कोण आहे?
‘सैयारा’ चित्रपटात दिसणारी अनित पद्डा ही अमृतसर, पंजाबची रहिवासी आहे, तिचा जन्म ऑक्टोबर २००२ मध्ये झाला. अनितला चित्रपट क्षेत्रात येण्याची आवड होती. म्हणूनच तिने कॉलेजच्या काळापासून मॉडेलिंग सुरू केली. अनित अनेक जाहिरातींमध्येही काम करताना दिसली आहे. दिल्ली विद्यापीठाच्या जीझस अँड मेरी कॉलेजमधून पदवी घेतल्यानंतर, अनित पद्डाला तिचा पहिला चित्रपट ‘सलाम वेंकी’ मिळाला जो २०२२ मध्ये प्रदर्शित झाला. काजोलच्या या चित्रपटात ती एका छोट्या भूमिकेत दिसली होती.
‘King’ च्या सेटवर अभिनेता शाहरुख खान जखमी? थांबले शूटिंग, चित्रपटाच्या सदस्याने सांगितले सत्य
यानंतर, अनित पद्डा प्राइम व्हिडिओच्या ‘बिग गर्ल्स डोन्ट क्राय’ शोमध्ये दिसली. आता ती ‘सैयारा’ चित्रपटात दिसली आहे. मुख्य अभिनेत्री म्हणून हा तिचा पहिलाच चित्रपट आहे, ज्याला विशेषतः जनरल झेडकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. हा चित्रपट काल १८ जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. आणि या चित्रपटाला कोणत्याही प्रमोशन शिवाय चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.