(फोटो सौजन्य - Instagram)
मनोरंजन विश्वातून एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येत आहे, ज्यामुळे चाहत्यांचे मन दुखावले गेले आहे. आपल्या विनोदी वेळेने सर्वांना हसवणारे विनोदी अभिनेता जॉर्ज वेंड्ट यांचे निधन झाले आहे. एनबीसी टीव्ही सिटकॉम चीअर्समध्ये बियर-बेलीड बारफ्लाय नॉर्मच्या एमी-नामांकित सहाय्यक भूमिकेसाठी ते अनेक वर्षे ओळखले जात आहे. जॉर्ज वेंड्ट यांच्या मृत्यूची बातमी त्यांच्या प्रचारक मेलिसा नाथन यांनी एका निवेदनाद्वारे दिली आहे. ही बातमी ऐकून आता त्यांच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला आहे.
‘धुरंधर’चित्रपटाच्या सेटवरील रणवीर सिंगचे फोटोज् लिक, अभिनेता दिसला चार वेगवेगळ्या लूक्समध्ये…
अभिनेत्याने घेतला झोपेतच जगाचा निरोप
मेलिसा नाथन यांनी त्यांच्या निवेदनात म्हटले आहे की, जॉर्ज वेंड्ट यांचे मंगळवारी लॉस एंजेलिसमध्ये निधन झाल्याची पुष्टी अभिनेत्याच्या कुटुंबाने केली आहे. सकाळी लवकर त्याच्या घरी झोपेतच त्यांनी शांतपणे जगाचा निरोप घेतला आहे. ते ७६ वर्षांचे होते. ही दुःखद बातमी आल्यानंतर चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्याला श्रद्धांजली वाहत आहेत. आणि निराशा व्यक्त करत आहेत. मेलिसा नाथन यांनी त्यांच्या निवेदनात म्हटले आहे की, ‘जॉर्ज वेंड्ट हे एक प्रेमळ कुटुंबातील माणूस, खूप प्रिय मित्र आणि त्यांना ओळखण्याचे भाग्य असलेल्या सर्वांचे विश्वासू होते. आम्हाला त्यांची नेहमीच आठवण येईल.’ असे त्यांनी म्हटले आहे.
In honor of the legendary George Wendt, here is every time Norm Peterson walks into Cheers pic.twitter.com/5qkPUNgFRU
— Kevin Dalton (@TheKevinDalton) May 20, 2025
जॉर्ज वेंड्ट यांची कारकीर्द
जॉर्ज वेंड्ट यांनी १९७० च्या दशकात त्यांच्या ‘शिकागो’ या मूळ गावी सेकंड सिटी इम्प्रोव्हिजेशनल कॉमेडी ग्रुपमधून त्यांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात केली. १९८० च्या दशकात त्यांनी अनेक प्राइम-टाइम कार्यक्रमांमध्ये हजेरी लावली. १९८२ मध्ये सीबीएस कॉमेडी ‘मेकिंग द ग्रेड’ द्वारे त्यांना ओळख मिळाली. तथापि, हा शो फक्त ६ भागांपुरता मर्यादित होता. जॉर्ज वेंड्टचे सर्वात लोकप्रिय पात्र म्हणजे बिअर पिणाऱ्या अकाउंटंट नॉर्म पीटरसनचे होते हे प्रेक्षकांना खूप आवडले.
पूजा सावंतच्या नव्या चित्रपटाची घोषणा, शुटिंगचा श्रीगणेशा…
एमी पुरस्कारासाठी नामांकन मिळाले
‘चीअर्स’ या शो व्यतिरिक्त, जॉर्ज वेंड्ट सॅटरडे नाईट लाईव्ह, द सिम्पसन्स आणि फ्लेच आणि फॉरएव्हर यंग सारख्या चित्रपटांमध्ये देखील दिसले आहेत. ते नेहमीच त्यांच्या विनोदाने लोकांना हसवत आले आहे. तर बियरप्रेमी नॉर्मची भूमिका करणाऱ्या वेंड्ट यांनी सलग सहा एमी नामांकने मिळवली आणि टीव्ही इतिहासात कायमचे स्थान मिळवले आहे.