(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
एकीकडे संपूर्ण देश दिवाळीच्या जल्लोषात मग्न होता, तर दुसरीकडे बॉलिवूडची डान्स क्वीन नोरा फतेहीच्या काही फोटोमुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली. नोराचे कोरियन अभिनेत्यासोबतचे हळदीचे फोटो व्हायरल झाल्याने चर्चांना उधाण आलं आहे.या फोटोंमध्ये नोरा पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे.तर फोटोमध्ये दोघांच्याही अंगाला हळद लागलेली दसत आहे.या फोटोत कोरियन अभिनेता आणि नोरा दोघंही वेगवेगळ्या पोझमध्ये एकत्र फोटो देताना पाहायला मिळत आहेत.
नोराचे कोरियन अभिनेत्यासोबतचे हळदीचे फोटो व्हायरल झाल्याने चर्चांना उधाण आलं आहे. नोराने तिच्या इन्स्टाग्रामवरुन काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ती कोरियन अभिनेता मिन होसोबत पोझ देताना दिसत आहे. दोघांनीही पिवळ्या रंगाची कपडे परिधान केल्याचं दिसत आहे. तर काही फोटोंमध्ये दोघांच्याही अंगाला हळद लागल्याचं दिसत आहे. “नोरा-मिन हो हळद कार्यक्रम…” असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे. या फोटोंवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत.
Asarani : असरानी यांचे शेवटचं स्वप्नं राहिले अपुरे, जाणून चाहत्यांनाही होईल पश्चाताप
नोरा खरंच लग्न करतेय की कोणत्या शूटिंगचा हा भाग आहे? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. “तुझं लग्न होतंय का?”, “हे शूटिंग आहे की रियल?”, “हे कधी झालं?”, “हे फोटो Ai चे आहेत का?”, “या दोघांचं लग्न…आयकॉनिक जोडी”, अशा अनेक कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.
नोरा फतेहीने २०१४ मध्ये हिंदी चित्रपट Roar: Tigers of the Sundarbans मध्ये अभिनयाची सुरुवात केली. त्यानंतर तिने तेलुगू आणि मल्याळम चित्रपटांमध्येही छोट्या भूमिका केल्या.
तिच्या “Dilbar” गाण्याच्या रिक्रिएट व्हर्जनने २४ तासांच्या आत २० मिलियन व्ह्यूज मिळवले आणि हे भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिले गाणे ठरले. तिने मोरोक्कन हिप-हॉप ग्रुप Fnaïre सोबत “Dilbar” चे अरबी व्हर्जन सादर केले.२०२५ मध्ये, तिने आंतरराष्ट्रीय गायक Jason Derulo सोबत “Snake” हे गाणे सादर केले, ज्यात पूर्व आशियाई आणि भारतीय संगीताचे मिश्रण आहे. या गाण्याचे संगीत व्हिडिओ मोरोक्कोमध्ये शूट करण्यात आले होते.